सिंधुदुर्ग today
ऐन गणेश चतुर्थीत विजेचा खेळ खंडोबा सुरूच ; ग्राहक - मुंबई कर चाकरमानी आक्रमक
नळपाणी योजनेवर विपरीत परिणाम
आता बस्स झाले दोन दिवसांत विज ग्राहक संघटना स्थापन
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव विभागामध्ये वीज वितरण कंपनीचा खेळखंडोबा सुरूच ग्राहक व मुंबई कर चाकरमानी आक्रमक झाले आहेत. श्री गणेश चतुर्थी आदल्या दिवशी बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी आगमन झाले असताना या गणेश चतुर्थीत विजेचा खेळ खंडोबा मात्र सुरू असून यामुळे ऐन पावसाळ्यात व गणेश चतुर्थी काळात नळपाणी योजनेवर विपरीत परिणाम होत आहे
आता बस्स झाले असून नांदगाव विभागातून उस्फुर्त पणे विज ग्राहक एकत्र येत असून दोन दिवसांत विज ग्राहक संघटना स्थापन होणार असल्याचे ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.
वीज ग्राहकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. गणेश चतुर्थी काळात असा विज पुरवठा खंडित झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा