सिंधुदुर्ग today
नांदगाव महापुरुष सेवा संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदगाव | प्रतिनिधी
श्री. महापुरुष सेवा संघ, मधली वाडी,नांदगांव कणकवली, यांच्या सौजन्याने आणि कै. पार्वती कृष्णा कांदळकर, कै. पुष्पलता आप्पा कांदळकर आणि कै. निर्मला कांदळकर यांच्या स्मरणार्थ 10 वी आणि 12 वी विध्यार्थी यांचा सत्कार समारंभ आज वसंतराव चव्हाण सभागृह नांदगाव मधली वाडी येथे संपन्न झाला आहे.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.सोहनी, महापुरुष सेवा संघांचे अध्यक्ष शशिकांत शेटये, महापुरुष सेवा संघांचे मुंबई चे अध्यक्ष सुरेश पाटील, आप्पा म्हसकर, वसंत कांदळकर, अजित महाजन, शाम म्हसकर, मनोहर म्हसकर, विठोबा कांदळकर, माजी सरपंच संजय पाटील, महापुरुष सेवा संघांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा