सिंधुदुर्ग today
बंदुकीची गोळी लागून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणे जामीन मंजूर.
अॅङ उमेश सावंत यांनी पाहीले काम.
कणकवली / प्रतिनिधी
रानटीजनावरांच्या शिकारीसाठी सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथील जंगलात गेलेले असताना जनावराच्या आवाजाच्या दिशेने काडतूसी बंदूकीतून मारलेला बार लागून साथीदार सचिन सुभाष मर्गज (रा. वेर्ले, ता. सावंतवाडी) याच्या अपमृत्यू प्रकरणी अटकेत असलेला सिप्रियान अँथोनी डान्टस रा. सावंतवाडी याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी ५० रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. त्यांना अॅङ फरहान राजगूरू यांनी सहकार्य केले.
दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ राऊळ याचा मावसभाऊ सचिन मर्गज आणि सिप्रियान डान्टस असे दुचाकीने ओवळीये येथील गाड्याचे गाळू येथील जगंलात शिकारीसाठी गेले होते. तेथे मयत सचिन हा रानटी जनावरांना डुसक्यण्यासाठी जंगलात गेला होता. काहीवेळाने जंगलातील पालापाचोळ्याचा आवाज आला. तो रानटी जनावरांचा आहे या समजूतीतून संशयिता सिप्रियाने याने त्याच्या बारा बोअर डबल बॅरल काडतूस बंदूकीतून गोळी झाडली. सदरची गोळी सचिन मर्गज याला लागून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीने त्याला डॉक्टरांकडेही दाखल केले होते. बंदूक हाताळताना झालेला निष्काळजीपणा आणि
व बंदुकीचा अवैध वापर यामुळे फिर्यादी सोमनाथ राऊळ यांच्या तक्रारीनुसार संशयितावर भा.न्या.सं. कलम १०५, शस्त्र अधिनियम ३/२५, ५/२७ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत असताना संशयिताच्यावतीने वाखल जामिन अर्जावर सुनावणी होत त्याची ५० जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश देताना अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, तपासकामात सहकार्य करावे या अटी घालण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा