सिंधुदुर्ग today



आदर्श व्यापारी संघटना तळेरेची महिला व्यापारी संघटना स्थापन.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना. 

पहिली महिला व्यापारी संघटनेची अध्यक्षा सौ. संपदा महाडिक यांची एकमताने निवड. 

सिंधुदुर्ग (ऋषिकेश मोरजकर)

 कणकवली तालुक्यातील तळेरे आदर्श व्यापारी संघटनेची महिला व्यापारी संघटना स्थापन करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ग्रामिण भागातील महिला व्यापारी संघटना म्हणून ठरली आहे.

    आदर्श व्यापारी संघटना तळेरे संलग्न महिला व्यापारी संघटना, तळेरे ची स्थापना आणि त्या निमित्त मेळाव्याला उपस्थित महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, कोषाध्यक्ष अरविंद नेवाळकर,अशोक गाड, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दिपक बेलवलकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, माने मॅडम,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर, उपसरपंच संदिप घाडी,सौ.अलका नारकर, अध्यक्ष श्री.राजू जठार, कार्याध्यक्ष अमोल सोरप, सहसेक्रेटरी आदित्य महाडिक, सहखजिनदार अशोक तळेकर, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पिसे, प्रविण वरुणकर, बाळा कदम,सचिन पावसकर,नामदेव वाडेकर,नुतन महिला अध्यक्ष सौ.संपदा महाडिक,सौ.नम्रता तळेकर, इत्यादी व्यापारी, महिला उपस्थित होते.

      यावेळी संघटनेची ध्येय - धोरणे यावर चर्चा झाली. महिलांना व्यवसायातून स्वयंपूर्ण बनविणे,संघटन वाढविणे त्याचबरोबर व्यवसाय करत असताना आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक उपक्रम,पर्यटन, क्रीडा विषयक, रोजगार मेळावे, उत्पादन व्यवसाय या क्षेत्रात काम करण्याचे ठरले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today