सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे उद्या दूध डेअरी चे उद्घाटन 

नांदगाव /प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव या संस्थेची स्थापना करून नांदगाव दुग्ध व्यवसाय सुरू होत आहे. उद्या गुरुवार दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नांदगाव वटव फाटा येथील या दुध डेअरीचे गणेश पूजन व उद्घाटन समारंभ नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी नांदगाव पंचक्रोशीतील सरपंच उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शेतकरी बंधूंनी ,नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today