सिंधुदुर्ग today
समस्त नांदगाव गावाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके यांचा झाला सन्मान.
जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचाही झाला सत्कार.
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा राज्य गीताने कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ हर्षदा वाळके, यांचा नांदगाव गावाला प्रथमच सभापती पद मिळाल्याने समस्त नांदगाव वासियांतर्फे सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत च्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता.तसेच कासार्डे जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव गावची सुकन्या तसेच वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ जिल्हा परिषद सदस्या सौ. रिद्धी सुतार तसेच कासार्डे पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये या सर्वांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, कल्पवृक्ष देवून सत्कार गावाच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रम सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच महाराष्ट्र गीत जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने सुरुवात करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, सौ. रिद्धी सुतार, पंचायत समिती सदस्य सहदेव उर्फ अण्णा खाडये, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये, माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, अण्णा शेटये, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण बापर्डेकर , माजी उपसरपंच भाई तोरसकर,निरज मोरये, नांदगाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, तसेच माजी चेअरमन रविंद्र तेली , दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन विठोबा कांदळकर, अरुण बापर्डेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
नांदगाव गावाला पहिल्यांदाच सभापती पदाचा मान
नांदगाव पंचायत समिती मध्ये यापूर्वी उपसभापती म्हणून दिवंगत लाला मेस्त्री, दिवंगत शांताराम मोरजकर तसेच पियाळी त्यावेळी नांदगाव पंचायत समिती मध्ये असल्याने संतोष कानडे यांनी पद भुषविले होते. त्यामुळे नांदगाव पंचायत समितीला पहिल्यांदाच सभापती पद मिळाल्याने त्यांच्या सत्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम नांदगाव ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रम प्रास्ताविक सरपंच भाई मोरजकर, सुत्रसंचलन ऋषिकेश मोरजकर, तर आभार सेवा निवृत्त केंद्र प्रमुख संतोष जाधव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी कमलाकर पाटील, नितेश म्हसकर, मारुती मोरये, राजू खोत, प्रफुल्ल तोरसकर आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा