सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील श्रीराम मंदिर चा सुवर्ण महोत्सवी निमित्त विविध कार्यक्रम.
राम नाम लेखन ,चित्रकला , पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.
उद्या संतोष जोईल विरुद्ध समीर कदम डबलभारी भजनाचा सामना.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव मोरयेवाडी येथील श्रीराम मंदिर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री राम नाम लेखन,चित्रकला, पाककला, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर उद्या बुधवार दिनांक २५ मार्च रोजी रात्री ठिक ९ वा. बुवा श्री. संतोष जोईल विरुद्ध समीर कदम यांच्या डबलभारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे.
तसेच श्री राम नवमी उत्सव दिवशी सकाळी ८ वा. श्रींची पुजा , सकाळी १० वा.किर्तन सौ. आरती बापट नारिंग्रे देवगद , १२.४० श्री राम जन्मोत्सव दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. महिलांचे भजन, सायंकाळी ६ वेशभूषा स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता श्री राम पालखी सोहळा मिरवणूक, रात्री ११ वा. अमृथनाथ सिध्देश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा भव्य नाट्य प्रयोग होणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा