सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे दूध डेअरी चे थाटात उद्घाटन ; नांदगाव पंचक्रोशीचे सरपंच उपस्थित
नांदगाव /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित नांदगाव या संस्थेच्या स्थापनेच्या माध्यमातून नांदगावमध्ये दुग्ध व्यवसाय सुरू होत आहे. आज नांदगाव ओटव फाटा येथील या दुध डेअरीचे उद्घाटन समारंभ नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यासाठी नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या सहीत नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, बेळणे सरपंच अविनाश गिरकर , सावडाव सरपंच आर्या वारंग , ओटव माजी सरपंच तथा जिल्हा परिषद सदस्या रुहीता तांबे, माजी जिल्हापरिषद सदस्य नागेश मोरये, गोकुळ दूध संघाचे सिंधुदुर्ग विस्तार अधिकारी राजेश गावकर,सुपरवायझर पुंडलिक येंडे, रोहित शिंदे नांदगाव दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन विठोबा कांदळकर, नांदगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झेमणे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्य सदस्य विनोद मोरये, संतोष बिडये, अक्षता खोत , जैबा नावलेकर , रमिजान बटवाले तसेच ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर नांदगाव माजी सरपंच सौ.बापर्डेकर आदी मान्यवर तसेच नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रम प्रास्ताविक दुग्ध उत्पादक संस्थेचे संचालक राजू तांबे, सुत्रसंचालन ऋषिकेश मोरजकर तर आभार दुग्ध उत्पादक सहकारी संस्थेचे सचिव राजू खोत यांनी मानले
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा