पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
  पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा. सिंधुदुर्गनगरी दिनांक 29 (ऋषिकेश मोरजकर) :-   मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार  दि. 30 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2.45 वाजता ओरोस परेड ग्राउंड येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता जिल्हा गुंतवणूक शिखर परिषदेस उपस्थिती (स्थळ:- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन, सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या शेजारी, सिंधुदुर्ग), दुपारी 4 वाजता जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह, ओरोस, सिंधुदुर्ग), सायंकाळी 5 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट (स्थळ:- ओरोस, सिंधुदुर्ग), रात्री 8.30 वाजता श्रीदेव इस्वटी ब्राह्यण महापुरुष येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ:- श्रीदेव इस्वटी ब्राह्यण महापुरुष, हरकुट बु. काळेथरवाडी, ता. कणकवली), रात्री 9.30 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच...

सिंधुदुर्ग today

इमेज
कोकण रेल्वे विविध प्रश्नांबाबत खा.नारायण राणे यांनी वेधले रेल्वेमंत्र्यांचे लक्ष  कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये दाखल होण्याची प्रक्रीया सुरु  वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गा बाबत खा. नारायण राणे यांचा आग्रह  नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण्याच्या प्रक्रीयेला गती देण्यात आली असतानाच प्रस्तावीत वैभववाडी ते कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी विशेष निर्णय घेण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दर्शविली. माजी केंद्रीय मंत्री खा.नारायण राणे यांनी नवी दिल्लीत रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली.  कोकण रेल्वेचे व्यवस्थापन सध्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे केले जाते. हे एक स्वायत्त महामंडळ असून  लवकरच हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे स्थानकादरम्यानच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करावी अशी मागणीही खा. नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान केली.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्...

सिंधुदुर्ग today

इमेज
अजय कांडर लिखित 'युगानुयुगे तूच' नाटक 4 रोजी देवगडला रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन - अभिनेते सचिन वळंजु यांचा अभिनय दूरदर्शनच्या निर्मितीनंतर  'युगानुयुगे तूच' पुन्हा रंगमंचावर कणकवली/प्रतिनिधी      मुंबई दूरदर्शनने निर्मिती करून प्रसारित केलेले कवी अजय कांडर लिखित 'युगानुयुगे तूच' हे नाटक मुंबई कांचन आर्टतर्फे पुन्हा रंगमंचावर येत आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे ' या विषयाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितेचे हे एकपात्री नाट्यरूपांतर आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक मराठी रंगभूमीवरील तरुण अभिनेते सचिन वळंजू ते सादर करत आहेत.रविवार ४ मे रोजी सायं. ७ वा.देवगड - जामसंडे येथील श्री स्वामी समर्थ सभागृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दिग्दर्शक रघुनाथ कदम यांनी दिली.      कवी अजय कांडर यांची मुंबई लोकवाड:मय गृहतर्फे युगानुयुगे तूच ही दीर्घ कविता प्रसिद्ध झाल्यानंतर तिच्या एक वर्षभरात तीन आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर या संग्रहावर स्वतंत्र...

सिंधुदुर्ग today

इमेज
सेवा हक्क कायदा 'दशकपूर्ती' कार्यक्रम नागरिकांना पारदर्शक व कालमर्यादेत सेवा द्या -जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी दि 28(ऋषिकेश मोरजकर) नागरिकांना शासनामार्फत व शासनाच्या अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक व कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला आहे. या अधिनियमाअंतर्गत नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा देण्यासाठी ह्या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिले.             सेवा हक्क कायद्याला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित 'दशकपूर्ती' कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.  यावेळी सेवा हक्क दिवसाच्या अनुषंगाने सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना जिल्हाधिकारी यांनी शपथ दिली.             जिल्हाधिकारी श्री पाटील म्हणाले, या कायद्याचा मुख्य उद्देश हा पात्र व्यक्तींना पा...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव विविध संघटनांच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून करण्यात आला तिव्र निषेध  पाकीस्तान झेंडा जाळून व्यक्त केला निषेध  मुर्दाबाद मुर्दाबाद पाकीस्तान मुर्दाबाद च्या घोषणा  कणकवली |प्रतिनिधी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकीस्तान मुर्दाबाद ,निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है ,भारत माता की जय, वंदे मातरम् ,जय जवान जय किसान आदी घोषणांनी नांदगाव तिठा परिसर आज दुमदुमून गेला.         जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नांदगाव व्यापारी संघटना ,रिक्षा संघटना, तसेच नांदगाव दशक्रोशीतील नागरीकांच्या वतीने आज नांदगाव तिठा ब्रिज खाली  काळ्या फिती लावून तिव्र निषेध करुन निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. तसेच पाकीस्तान झेंडा प्रती जाळून तिव्र निषेध करण्यात आला आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,नांदगाव आदर्श व्यापारी संघटना उपाध्यक्ष रज्जाक बटवाले ,सचिव ऋषिकेश मोरजकर, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरी वायंगणकर...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच ; भागात पूर्णतः अंधार  आंदोलन नोटीस दिल्याशिवाय कंपनीला जाग येईना   कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या गावातील हायवे संदर्भात प्रलंबित कामांवर प्रकाश झोत टाकला जात आहे. आजच्या न्यूज मध्ये पहाणार आहोत नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचं प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही या भागात हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. येथे पथ दिवे सुरुवातीला लावण्यात आले होते. परंतु ट्रांसफार्मर साठी जागा उपलब्ध होत नव्हती नंतर सरपंच भाई मोरजकर यांच्या मध्यस्थीने अमोल गावकर यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली. यानंतर स्ट्रीट लाईट सुरूही झाली .दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये शाळेतील सहल बस चा अपघात नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर होत एस टी कठड्याला आदळून स्ट्रीट लाईट बंद पडल्या होत्या. त्यापासून संबंधित विभागाला वारंवार याबाबत सूचना करूनही त्याची दखल अद्यापही घेतलेली नाही यामुळे भागात यामुळे पूर्णतः अंधार पसरलेला आपल्याला दिसत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे हायवे प्राधिकरण ला दिशादर्शक फलक लावण्यासाठी मुहूर्त सापडेना. वाहनचालक कुणकेश्वर, देवगड ला जाणारे येतात ओटव फाटा ब्रिज खाली. उद्याच्या अंकात वाचा -नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच ; भागात पूर्णतः अंधार. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून नांदगावची ओळख आहे. या गावातून देवगड निपाणी राज्य महामार्ग जात आहे तसेच कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी नांदगाव तिठा येथून जावे लागते .        मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणानंतर संपूर्ण चेहरा मोहरा च बदललेला आपल्याला दिसत आहे. हायवे ची कामे पूर्णत्वाकडे जात असतानाच  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मात्र हायवे ची बरीच कामे प्रलंबित असल्याचे आपण पहातो आहे. कालच्या भागात आपण सौर पथ दिवे बंद अवस्थेत आणि बोरमळा संरक्षण भिंत नसल्याने धोकादायक स्थितीचा सामना करावा लागतो यावर प्रकाश टाकला होता.         नांदगाव गावची लोकसंख्या पहाता नांदगाव अगदी बेळणे हद्दी नंतर ते असलदे पर्यंत तर ओटव सिम...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव व्यापारी संघटना व विविध संघटनांच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावणार. आज सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन.  कणकवली |प्रतिनिधी  जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून तिव्र निषेध नांदगाव तिठा ब्रिज खाली आज सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी १० वा. काळ्या फिती लावून निषेध करुन निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे. तरी नांदगाव दशक्रोशीतील सर्व व्यापारी,नागरिकांनी, रिक्षा संघटना, सर्व व्यवसाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ओटव ओटववाडी येथील पावणादेवी मंदिरातील घंटा अज्ञात चोरट्याने चोरली  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील ओटव ओटववाडी येथील पावणादेवी मंदिरातील घंटा व निरंजन असे एकूण ७२८० रुपये किमतीच्या निरंजन व पितळेची घंटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दुर्गेश रामचंद्र ओटवकर यांनी दाखल केली आहे.सदर घटना १७ एप्रिल २०२५ सकाळी ८ ते २३ एप्रिल २०२५ रोजी ३.३० वाजण्याच्या मुदतीत घडल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

सिंधुदुर्ग today

इमेज
गुरे वाहतूक करणारा महिंद्रा पिकप बेळणे येथे बजरंग दलाने पकडला. पोलीस निरीक्षक मारुती जगताप घटनास्थळी पोलीस फौजफाटा सहीत दाखल. नांदगाव | प्रतिनिधी कणकवली तालुक्यातील एका ग्रामीण भागातून नांदगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गावरुन कणकवली च्या दिशेने गुरे वाहतूक करणारा एक घाट माथ्यावरील महिंद्रा पिकप बेळणे येथील लता नगरी दरम्यान पाठलाग करत बजरंग दलाने पकडला असून यात काही गुरे आढळून आल्याने संतप्त बजरंग दल तसेच जमाव वाढू लागला दरम्यान याबाबत कणकवली पोलीस यांना माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री शेडगे यांच्या सहीत पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने सदर गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पो सहीत चालकाला कणकवली पोलीस ठाण्यात अधिक तपासासाठी आणण्यात आले. दरम्यान यावेळी उपस्थित सर्वांनी सदर गुरे गो शाळेत देण्यात यावी. आणि आरोपी वर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सदर घटना आज सकाळी १०.४५ च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर बेळणे लता नगरी दरम्यान घडली.       यावेळी बजरंग दलाचे सागर डंबे , निखिल पिसे, तेजस भांबुंरे श्री खरात, अमोल गावकर, प्रदीप हरमलकर,श्रीकृष्ण वा...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील समस्यांची ऐशी तैशी. हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी लक्ष देईनात.  उद्याच्या बातमीत वाचा -  दिशादर्शक फलक लावण्यासाठी मुहूर्त सापडेना ; वाहनचालक कुणकेश्वर तसेच देवगड ला जाणारे येतात ओटव फाटा ब्रिज खाली कणकवली (ऋषिकेश मोरजकर)         कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील  नांदगाव येथील हायवे संदर्भात बरीच कामे प्रलंबित आहेत. याबाबत कित्येक वेळा हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी यांच्या येथे पाठपुरावा केला तरी संबंधित यंत्रणेला नांदगाव येथील हायवे संदर्भात प्रलंबित कामांसाठी मुहूर्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.     नांदगाव शाळा नंबर 1 येथे दोन्ही बाजूला लावलेले सौर पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे या भागात पूर्णतः अंधार पसरलेला दिसत आहे. जर हायवे प्राधिकरण अथवा केसीसी कंपनीला अशा लावलेल्या पथदिव्यांचा  मेंटनस करायचा नसेल तर असे पथदिवे का लावले जातात ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे कित्येक प्रश्न आज नांदगाव येथील हायवेचे प्रलंबित आहे. या प्रश्नांकडे पूर्णतः सदर कंपनीने डोळेझाक क...

सिंधुदुर्ग today

इमेज
अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पोर्टलवर करणे बंधनकारक. सिंधुदुर्गनगरी, दि.22 (ऋषिकेश मोरजकर .) :-   कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे कलम ४ अन्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश केंद्र शासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना तसेच इंटरप्रायझेस इ. यांना आवाहन करण्यात येते की, ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करुन खाली नमूद केलेल्या कार्यपद्धतीचा वापर करून सदर समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करण्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. SHE BOX PORTAL वर अंतर्गत तक्रार समिती नोंदविण्याची कार्यपद्धती- https://shebox.wcd.gov.in या वेबसाईट वर जा. private head office registration या tab वर click करा. आव...

सिंधुदुर्ग today

इमेज
परप्रांतीय नौकेवर सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीप्रकरणी कारवाई : नौका जप्त, मासळीचा लिलाव  मालवण |प्रतिनिधी   – महाराष्ट्र सागरी मासेमारी (नियमन) अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २१ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११.३९ वाजण्याच्या सुमारास मुणगेच्या समोर अंदाजे ९-१० सागरी मैलांवर, म्हणजेच अठराव्या वाव पाण्यात, करण्यात आली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, सिंधुदुर्ग, श्रीमती तेजस्विता भ. करंगुटकर या नियमित गस्त घालत असताना, कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली "श्रीम. वेदवती स. पुथरण, रा. मारीकंबा नगर थोत्तम, उडपी, राज्य - कर्नाटक" यांची "श्री महालक्ष्मी ३" (नोंदणी क्र. IND-KA-2-MM-6268) ही नौका महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात मुणगेसमोर अनधिकृतरीत्या मासेमारी करताना आढळून आली. सदर नौकेवर एक तांडेल व सहा खलाशी असे एकूण सात सदस्य होते. नौका ताब्यात घेऊन ती सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. यावर आढळलेली अंदाजे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीची मासळी लिलावासा...

सिंधुदुर्ग today

इमेज
चीपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार,; एमएसइबी ची प्रशासकीय मान्यता पालकमंत्री नितेश राणें यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी   चिपी विमानतळाच्या विद्युतीकरण व नाईट लँडिंगचा प्रश्न निघणार निकाली ऋषिकेश मोरजकर|सिंधुदुर्ग :         गेल्या तीन वर्षांपासून चीपी विमानतळाच्या ठिकाणी असलेल्या विद्युतीकरणाच्या समस्या आता मार्गी लागणार आहेत. विमानतळावरील विद्युतीकरणाच्या समस्यांसहित लाईन शिफ्टिंग व रूपांतरणाच्या कामासाठी जिल्हा नियोजन मधून दोन कोटी 37 लाख 57 हजार रुपयांच्या खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नाईट लँडिंगची समस्या आहे यामुळे सुटणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार सदरची कार्यवाही करण्यात आली आहे.चीपी विमानतळ करिता एमएससीबी ने प्रशासकीय मान्यता दिली आहे. चिपी विमानतळासाठी वीज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील पाट फिडरकडून जाणाऱ्या ११ केव्ही लाईनच्या शिफ्टींग व ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  तोंडवली नर्सिंग कॉलेज तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांचे शंभर नंबरी यश. नांदगाव |प्रतिनिधी  सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग बीएससी तोंडवली तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा निकाल १००%  लागला.तर ८३•१४% गुण मिळवत जयेश मुंडये या विद्यार्थ्यांने महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला.       महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नर्सिंग तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परिक्षेसाठी तोंडवली नर्सिंग कॉलेज मधून २७ विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.यामधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.यामधून महाविद्यालयात अनुक्रमे जयेश मुंडये ८३•१४% , जान्हवी सासोलकर ८२•५३ , अंकीता हर्यान ८१•१४% गुण मिळवत महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी तोंडवलीचे अध्यक्ष वसंतजी सावंत, सचिव निखीलजी सावंत, प्राचार्या डॉ शकुंतला नागरा...

सिंधुदुर्ग today

इमेज
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड. कृषी विभागा मार्फत  मागविण्यात आले  अर्ज. कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड सन २०२५/२६ करीता कृषी विभागा कडून अर्ज मागविण्यात येत असून , पंचक्रोशी तील सर्व शेतकऱ्यांनी फळबाग लागवडी साठी अर्ज करावे असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी तळेरे श्री अर्जुन जाधव यांनी केले आहे. अधिक माहिती साठी आपले नजीक च्या कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करावा.महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत- फळ्झाडे , वृक्ष , फुलपिके, औषधी वनस्पती, मसाला पिके  लागवड तसेच गांडूळ खत /नाडेप कंपोस्ट युनिट/रेशीम उद्योग विकास   I) लागवड कोणत्या ठिकाणी करता येते- 1.वैयक्तीक लाभार्थ्याच्या सलग शेतावर-फळ्झाडे लागवड/वृक्ष लागवड व फुलपिके लागवड 2.वैयक्तीक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर-फळ्झाडे लागवड /वृक्ष लागवड  3.वैयक्तीक लाभार्थ्याच्या पडीक शेत जमिनिवर-फळ्झाडे लागवड /वृक्ष लागवड II) लाभार्थी पात्रता- 1) अनुसूचित जाती(SC) 2) अनुसूचित जमाती(ST) 3) भटक्या जमाती(Nomadic Tribe...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव ११ मे रोजी. जत्रोत्सव नियोजन बैठक संपन्न ; जत्रोत्सवाची तयारी सुरू  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी रविवार दिनांक  ११ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.        यानिमित्ताने जत्रा नियोजनासाठी आज  श्री देव कोळंबा मंदिर नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाची नियोजन बैठक आज अध्यक्ष नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.         रविवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने कार्यक्रम सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेड करणे , दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद अशा प्रकारे जत्रोत्सव असणार आहे.  जत्रोत्सवात मटण भाकरीचा प्रसाद ;भाकरी पिठाचे नियोजन. या जत्रोत्सवाचे विशेष म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शन घेतल्यानंतर मटण व भाकरीचा ...

सिंधुदुर्ग today

इमेज
  तोंडवली नर्सिंग कॉलेज द्वितीय वर्षाचा निकाल १००%   नांदगाव/प्रतिनिधी  श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग बीएससी द्वितीय वर्षाचा निकाल १००% लागला असून साक्षी गवस हिने ८६% गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला ‌.       महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बीएससी नर्सिंग परिक्षेसाठी श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग मधून द्वितीय वर्षात एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यामधून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले ‌.यामध्ये साक्षी विजय गवस ८६% शिवानी संतोष बागवे ८४•५७% सुहाणी सुहास कुंभार ८३•४२ यांनी अनुक्रमे महाविद्यालयात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.         तर प्रथम वर्षातील प्रथम व द्वितीय सत्रातील बीएससी नर्सिंग कॉलेजचा निकाल अनुक्रमे ८९•४७ व ९६•०६% लागला असून प्रथम वर्ष प्रथम सत्रात दिपश्री दिलीप सावंत ८३•२% प्रथम,रुतल दिनेश कुपेरकर ८० % द्वितीय तर महिमा संतोष तावडे ७९•२% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.तर प्रथम वर्ष द्वितीय सत्रातील निकाल ९६•६% लागला असून ने...

सिंधुदुर्ग today

इमेज
दोन एल.ई.डी. नौकां मालवण समुद्रात पकडल्या सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई सुरू. मालवण : प्रतिनिधी  महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे ८ ते ९ सागरी मैल समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील दोन एल.ई.डी. नौकांवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने करवाई केली आहे.  सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करून सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधदुर्ग कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण ६५ खलाशी आहेत. तर अंदाजे ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे. तसेच सदर नौकांना ५ ते ६ लक्ष दंड होण्याची शक्यता आहे. 16 एप्रिल रात्री मालवण समोर मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी रविंद्र ग. मालवणकर, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, दांडी मालवण हे नियमित गस्त घालत होते. यावेळी रत्नागिरी येथील परवाना असलेल्या नौका हाजि जावेद नों. क्र.- IND-MH-४-MM-५८४३ व YM-मातिन-H-इस्माईल नों. क्र.- IND-MH-४-MM-५४०९ द्वारे महाराष्ट्रातील ...

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली शहरातील तो कृत्रिम धबधबा करण्यात आला सुरू - मुख्याधिकारी गौरी पाटील  कणकवली| ऋषिकेश मोरजकर  कणकवली गणपती साना येथे बाराही महिने वाहणारा  कृत्रिम धबधबा आता सुरू करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे. सध्या या धबधब्याच्या ठिकाणी  लहान मुले  आंघोळीचा  आनंद लुटत आहेत . या धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते  करण्यात आले होते.उद्घाटन झाल्यानंतर काही महिने तांत्रिक अडचणींमुळे हा धबधबा  बंद होता. पण या तांत्रिक अडचणी दूर करून आता हा धबधबा कणकवली वासीयांना खुला करण्यात आला असून सध्या याची वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8 अशी ठेवण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे.  त्यामुळे कणकवली शहरासह अन्य  सर्वसामान्याना बाराही महिने वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली आनंद लुटता येणार आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  अजय कांडर लिखित 'कळत्या न कळत्या वयात' नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर व्हावेत मुंबईतील यशस्वी नाट्य प्रयोगानंतर मान्यवरांची अपेक्षा रघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाला, कलाकार डॉ.अनुराधा कान्हेरे, निलेश भेरे, दीपा सावंत खोत, अपर्णा शेट्ये यांच्या अभिनयाला दाद कणकवली/ऋषिकेश मोरजकर       कवी अजय कांडर यांची कविता कधी एकांगी विचार मांडत नाही. त्यामुळे त्यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितेवरी 'कळत्या न कळत्या वयात' हे नाटक वस्तुस्थिती दर्शक भाष्य करते. या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग होत राहिला पाहिजे असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा.डॉ. मीना गोखले यांनी व्यक्त केले.      मुंबई दीप तारांगण निर्मित दीपा सावंत खोत यांची निर्मिती असलेले अजय कांडर लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित 'कळत्या न कळत्या वयात' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबई रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला. नाटकानंतर झालेल्या चर्चेत बोलताना प्रा. डॉ.गोखले यांनी या नाटकाचे जसे अधिकाधिक प्रयोग होत जातील तसे ते नाटक अधिकाधिक सफाईदार प्रभावीपणे सादर होत जाईल असेही निरीक्षणही नोंदवले. 'कळत्या न क...

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डेतील संजय नकाशे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)     कणकवली तालुक्यातील कासार्डेतील संजय नकाशे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.        एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगाव व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगाव याच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला जाणारा राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार कासार्डेतील माजी तंटामुक्त अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय नकाशे याना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण रविंद्र भवन,साखळीन गोवा येथे २७ एप्रिल २०२५ रोजी होणार असून यावेळी वरील पाच राज्यातील मान्यवरांच्या हस्ते श्री. संजय नकाशे याना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल संजय नकाशे याचे सर्वच स्तरावर कौतुक होत अभिनंदन होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
लक्झरी बस मधून बॅक लिफ्टिंग करून वारंवार दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना केले गजाआड. मुंबई गोवा महामार्गावरील असलदे येथील हॉटेल दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कारवाई. कणकवली (विशेष प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बस मधून बॅक लिफ्टिंग करून वारंवार त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करून घेऊन पलायन करणार्या चोरट्यांना काल रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी शिताफीने जेरबंद केले आहे.        सदर कारवाई काल रात्री मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव नजिक असलेल्या असलदे ग्रीन फील्ड हॉटेल येथून केली. असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.       जाहीर निजामुद्दीन खान  वय 40 राहणार ,जाहीर याकूब खान वय 40,  रब्दर सोजर  हुसैन,  रफिक नियाज खान सर्व राहणार मध्य प्रदेश यांना ब्रिझा कारसह ताब्यात घेतले आहे.       सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा अनधिकृत दुकान बांधकाम हटविणे काम केले बंद  हायवे प्राधिकरण ने हद्द निश्चित करावी नंतरच अतिक्रमण हटवावे ; गाळ्याधारकांची मागणी.  डि.वाय एस.पी. आढाव यांची नांदगाव ला भेट; पोलीस छावणीचे स्वरुप. कणकवली  (ऋषिकेश मोरजकर) मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिटा येथे अनधिकृत असलेले दुकान बांधकाम गाळे तसेच उड्डाण वीज खाली असलेले स्टॉल हटाव मोहीम  आज सकाळपासून सुरू झाली होती .काही दुकाने हटविण्यात आली. नंतर काही पुढील अतिक्रमणे हटविताना उपस्थित गाळ्या धारकांनी आक्षेप घेत अनधिकृत असलेली सर्वच बांधकामे हटवावीत अशी जोरदार मागणी करत जोपर्यंत हायवे प्राधिकरण हद्दी निश्चित दाखवित नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवावी अशी मागणी केली. दरम्यान अनधिकृत दुकान बांधकाम हटविणे हे ४ दिवसांसाठी मोहीम स्थगित ठेवण्यात आली असून या कालावधीत हायवे प्राधिकरण व भुमी अभिलेख विभागा मार्फत हद्द निश्चित करण्यात येणार असून यानंतर पुढील मोहीम राबविण्यात येणार असल्याचे हायवे प्राधिकरण चे उप अभियंता अतुल शिवनिवार यांनी बोलताना सांगितले आहे.  यावेळी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रक...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा अनधिकृत दुकान बांधकाम हटवण्यासाठी सुरुवात. पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात  कणकवली  (ऋषिकेश मोरजकर) मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिथं येथे अनधिकृत असलेले दुकान बांधकाम गाळे तसेच उड्डाण वीज खाली असलेले स्टॉल हटाव मोहीम आज सकाळपासून सुरू झाली आहे. ही आता मोहीम आज 13 एप्रिल आणि उद्या 14 एप्रिल रोजी असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासहित पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून       पीडब्ल्यूडीचे अतुल शिवनिवार उप अभियंता कुमावत तसेच केसीसी चे कर्मचारी उपस्थित होते. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप  , पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , किरण मेथे , बावधाने, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात होती.      नोटिसा दिल्यानंतर आज पासून हटाव मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर व्यवसायिकांनी आपापली दुकाने काढण्यास स्वतः सुरुवात केली. सर्व असलेल्या साहित्य इतरत्र हलवून यंत्रणेला संपूर्ण सहकार...

सिंधुदुर्ग today

इमेज
  उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश फरीद काझी यांच्यासह वाघोटन दोन ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का कणकवली प्रतिनिधी       उबाठा शिवसेना गटाचे देवगड तालुका युवा सेनाप्रमुख फरीद काझी यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत वाघोटन ग्रामपंचायत सदस्या श्रुती घाडी व दीपाली गोठणकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. उबाठा शिवसेना पक्षाच्या नेतृत्वशैली व कार्यपद्धतीला कंटाळून हे पदाधिकारी भाजपात प्रवेश करत आहेत. प्रवेश करताना, नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या जलद व सकारात्मक विकासकामांमुळे ते आता "विकास पुरुष" म्हणून संपूर्ण सिंधुदुर्गचे नेतृत्व कर...

सिंधुदुर्ग today

इमेज
  फोंडाघाट येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  कणकवली प्रतिनिधी  आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती मोहत्सवा निमित्त फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ, फोंडाघाट व भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाट यांच्या मार्फत तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दि.13एप्रिल 2025 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्र.₹1000/-द्वितीय क्र.₹750व तृतीय क्र.₹500 असे आहे. स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत. 1)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण 2)म. ज्योतीराव फुले यांचे शिक्षणं व कार्य 3)म. ज्योतीराव फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर -एक शैक्षणिक परिवर्तन         स्पर्धा रविवार दि.13एप्रिल सकाळी 10 पासून चालू होईल स्पर्धेत जास्तीस जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे मंडळाच्या अध्यक्षा सुचिता जाधव व सचिव प्रा. संतोष आखाडे यांनी केले आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
अजय कांडर लिखित 'कळत्या न कळत्या वयात' नाटक १४ रोजी मुंबई रवींद्र नाट्य मंदिरात दीपा सावंत खोत यांची निर्मिती, रघुनाथ कदम यांचे दिग्दर्शन कांडर यांच्या आवानओल काव्यसंग्रहातील कवितांचे नाट्यरूपांतर कणकवली/प्रतिनिधी     मराठीतील सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या प्रतिष्ठित महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार विजेत्या बहुचर्चित 'आवानओल' काव्यसंग्रहातील कवितांवरील 'कळत्या न कळत्या वयात' या नाटकाचा शुभारंभ सोमवार १४ एप्रिल रोजी सायं. ७ वा. मुंबई प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात येणार आहे. मुंबई दीप तारांगण प्रोडक्शन हाऊसतर्फे कळत्या न कळत्या वयात नाटक रंगभूमीवर सादर होत असून रघुनाथ कदम यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असल्याची माहिती या नाटकाच्या निर्मात्या दीपा सावंत खोत यांनी दिली.       निलेश भेरे, डॉ. अनुराधा कान्हेरे, अपर्णा शेट्ये आणि दीपा सावंत खोत आदी कलाकार हे नाटक सादर करणार आहेत.तर रजनीश कोंडविलकर यांचे नेपथ्य लाभले असून संजय तोडणकर यांची प्रकाशयोजना तर अक्षय जाधव यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. अजय कांडर यांचा 'आवानओल' हा संग्रह 2005 मध्ये शब्...

सिंधुदुर्ग today

इमेज
खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त ... असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांच्या माध्यमातून फळे वाटप. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त  असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे. कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांच्या माध्यमातून फळे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.         आलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत नारायणराव राणे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले तसेच वृद्धाश्रमामध्ये वयोवृद्ध असलेल्या वृद्धांनीही नारायणराव राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद दिले        यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, असलदे उपसरपंच सचिन परब,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कळसुली सरपंच अतुल दळवी,नारायण दळवी,शाम दळवी,विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, प्रशांत परब , रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर,असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब , नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब , संतोष हडकर, श्रीराम मोरजकर,महेश लोके, परशूराम परब , देवेंद्र लोके...

सिंधुदुर्ग today

इमेज
खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त... कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांचे असलदे येथे जंगी स्वागत  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त  कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांचे जल्लोषी स्वागत असलदे भाजपच्या असलदे माजी चेअरमन प्रकाश परब यांच्या हस्ते कल्पवृक्ष व शाल देऊन स्वागत करण्यात आले.      यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर,शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर,असलदे उपसरपंच सचिन परब,विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, प्रशांत परब , रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर,असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब , नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब , संतोष हडकर, श्रीराम मोरजकर,महेश लोके, परशूराम परब , देवेंद्र लोके , रुपेश खरात आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली ते कुणकेश्वरला पायी जाणाऱ्या भाविकांची नांदगाव तिठा येथे जल्लोषी स्वागत  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) खासदार नारायणराव राणे  यांच्या वाढदिवसानिमित्त  कणकवली ते कुणकेश्वरला कणकवली माजी नगराध्यक्ष समिर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली पायी जाणाऱ्या भाविकांचे जल्लोषी स्वागत नांदगाव तिठा ब्रिज खाली नांदगाव विभागाच्या वतीने करण्यात आले.        यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख व नांदगाव सरपंच भाई मोरजकर, विधानसभा संयोजक संतोष जाधव, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील,असलदे उपसरपंच सचिन परब,प्रदीप हरमलकर, प्रशांत परब , रघुनाथ लोके, श्रीकृष्ण वायंगणकर,असलदे बुथ अध्यक्ष संतोष परब , नांदगाव युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये, कमलाकर पाटील, उदय परब , संतोष हडकर, श्रीराम मोरजकर, संदीप पाटील आदी बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे नागरी हक्क आणि महिला हक्क कायदा मार्गदर्शन संपन्न  सिंधुदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती चव्हाण यांनी केले मार्गदर्शन  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  नांदगाव ग्रामपंचायत येथे आज  नागरी हक्क संरक्षण कायदा तसेच महिला हक्क कायदा अशा नवीन व जुन्या कायद्या विषयी सखोल माहिती देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंधुदुर्ग श्रीमती  ज्योती चव्हाण यांनी महीला कायदा संदर्भात मार्गदर्शन केले.               यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, पोलीस हवालदार प्रसाद कामत, नांदगाव ग्रामपंचायत अधिकारी आर.डी. सावंत, नांदगाव पोलीस पाटील सौ. वृषाली मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर,अनिकेत तांबे तसेच गावातील नागरिक, महिला उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत संपन्न नांदगाव सर्वसाधारण महिला राखीव. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज कणकवली कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली. यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण ५,नागरिकांचा मागास प्रवर्ग १७,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ९,नागरिकांचा मागास प्रवर्ग ८,सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२,सर्वसाधारण महिला २१ अशी आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.      अनुसूचित जाती आरक्षण ५ यापैकी अनुसुचित जाती महिला नवीन कुर्ली, पिसेकामते, वाघेरी तर अनुसुचित जाती प्रवर्ग २ शिरवल, दारिस्ते , नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ९ यामध्ये कलमठ, ओझरम, लोरे, वागदे, खारेपाटण,  हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी,चिंचवली नागरिकांचामागास प्रवर्ग ८ नडगीवे, ओटव, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे, आयनल सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ तर सर्वसाधारण महिला २१ यामध्ये असलदे, कळसुली, कळवण - तळवडे, कुरंगवणे, बेरले, कोंडये, कोळोशी, डांमरे, त...

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव भाजपचे युवा बुथ अध्यक्ष मारुती मोरये यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील व्यवसाईक आणि भारतीय जनता पक्षाचे युवा बुथ अध्यक्ष मारुती कृष्णा मोरये यांच्या ४९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिविजा वृध्दाश्रम येथे केळी व बिस्कीट असे खाऊ वाटप करण्यात आले.         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पंढरी वायंगणकर, भाजपचे महिला तालुकाध्यक्षा सौ हर्षदा वाळके भारतीय जनता पक्षाचे विधानसभा संयोजक संतोष जाधव, प्रदीप हरमलकर, मंगेश मोरये, मारुती मोरये, ऋषिकेश मोरजकर,कमलेश पाटील ,एकनाथ मोरये, व्दिविजा वृध्दाश्रम संचालक श्री.शेटये आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
रामेश्वर पेट्रोल पंप असलदे यांच्यावतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्राहक म्हणून आप्पा इंदप यांचा सत्कार  कणकवली प्रतिनिधी     ‌  रामेश्वर पेट्रोल पंप असलदे यांच्यावतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्राहक म्हणून कृष्णाजी उर्फ आप्पा इंदप यांची निवड करण्यात आली.गुढीपाडव्याचे औचित्य साधून आप्पा इंदप यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व कंपनीच्या वतीने प्रभू रामचंद्र व पादूकांची प्रतिमा भेट दिली.       गुढीपाडव्याचे औचित्य साधून असलदे येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या रामेश्वर पेट्रोल पंप कडून यावर्षीपासून ग्राहक व कंपनी यांच्यामध्ये विश्वासाची गुढी उभारण्याची सुरवात यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.वर्षभरातील सर्वोत्कृष्ट ग्राहक ठरलेले कोळोशी येथील आप्पा इंदप यांनी रामेश्वर पेट्रोल पंपाशी केलेले प्रामाणिक व्यवहार, विश्वास पाहता कंपनी व रामेश्वर पेट्रोल पंप असलदेचे मालक पाताडे परिवार यांनी सर्वोत्कृष्ट ग्राहक आप्पा इंदप यांचा सत्कार केला.       यावेळी रामेश्वर पेट्रोल पंपचे मालक राजन पाताडे, युगंधर पाताडे, आप्पा इंदप, जयप्रकाश पाताडे...

सिंधुदुर्ग today

इमेज
१८ तारीखपासून मुंबई - चिपी  विमान सेवा सुरु सिंधुदुर्ग विमानतळावर  मुंबई - पुणे बरोबरच अन्य शहरांसाठी लवकरच विमान सेवा  एअर  अलायन्स सेवे बरोबरच इंडिगोचीही विमान उतरणार सिंधुदुर्ग विमानतळावर  - खा. नारायण राणे यांनी दिली माहीती  नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) : परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर  येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई - सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू  यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे  माजी केंद्रीय मंत्री , खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून  सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.   गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुन: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई  अशी सेवा सुरु करण्यासाठी  उड्डाण संचालनालयाने  ...

सिंधुदुर्ग today

इमेज
संदेश सावंत यांच्या ५१ वाढदिवसानिमित्त असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे खाऊ वाटप. नांदगाव/प्रतिनिधी जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे सर्व वृध्दांना अनुसूचित जाती जमाती सेल चे विधानसभा संयोजक संतोष जाधव यांच्या माध्यमातून आज फळे व खाऊ वाटप करण्यात आले आहे.       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अनुसूचित जाती जमाती सेल चे विधानसभा संयोजक  संतोष जाधव,असलदे उपसरपंच सचिन परब, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, तुकाराम तुप्पट , वृध्दाश्रम संचालक शेटये आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
चोरी करून पळणाऱ्या आरोपीला बारा तासात ठोकल्या बेड्या. पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची धडक कारवाई कणकवली (ऋषिकेश मोरजकर) चोरी करून पळणाऱ्या आरोपीला बारा तासातच बेड्या ठोकल्या असून कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी धडक कारवाई केली असल्याने कणकवली पोलीसांचे अभिनंदन होत आहे.        याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली पोलीस ठाणे येथे दिनांक 01/04/2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 81/2025,BNS 2023 चे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल असून याबाबत पोलीसात तक्रार हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण, व्यवसाय कन्स्ट्रक्शन,राहणार-विद्यानगर कणकवली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. चव्हाण यांच्या  कन्स्ट्रक्शन साइटवर मागील पंधरा दिवसापासून काम करणारा मूळ नेपाळ देशाचा असणारा कामगार रंजीत शंकर पैसवाल हजरा तुसाद, वय 28  वर्षे,राहणार नेपाळ देश याने फिर्यादी यांचे घरातील रोख रक्कम 47,000/- तसेच 5.5 ग्रॅम वजनाची सोन्याची कुडी,4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून फिर्यादी यांची बजाज डिस्कवर मोटरसायकल क्रमांक MH07 Y 8178 ही घेऊन दिनांक 31/3/2025 रोजी पळून गेलेला होता.फिर्याद...