सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे हायवे प्राधिकरण ला दिशादर्शक फलक लावण्यासाठी मुहूर्त सापडेना.
वाहनचालक कुणकेश्वर, देवगड ला जाणारे येतात ओटव फाटा ब्रिज खाली.
उद्याच्या अंकात वाचा -नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच ; भागात पूर्णतः अंधार.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून नांदगावची ओळख आहे. या गावातून देवगड निपाणी राज्य महामार्ग जात आहे तसेच कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी नांदगाव तिठा येथून जावे लागते .
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणानंतर संपूर्ण चेहरा मोहरा च बदललेला आपल्याला दिसत आहे. हायवे ची कामे पूर्णत्वाकडे जात असतानाच
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे मात्र हायवे ची बरीच कामे प्रलंबित असल्याचे आपण पहातो आहे. कालच्या भागात आपण सौर पथ दिवे बंद अवस्थेत आणि बोरमळा संरक्षण भिंत नसल्याने धोकादायक स्थितीचा सामना करावा लागतो यावर प्रकाश टाकला होता.
नांदगाव गावची लोकसंख्या पहाता नांदगाव अगदी बेळणे हद्दी नंतर ते असलदे पर्यंत तर ओटव सिमेपर्यंत आहे. चौहोबाजूनी नांदगाव विखुरलेले आहे. नांदगाव येथे हायवे चे दोन
बॉक्स ब्रिज झाले आहेत. एक कणकवली हुन मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या अगोदर नांदगाव ओटव फाटा ब्रिज मिळते या ब्रिज खाली नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ओटव माईण रस्ता गेलेला आहे. नांदगाव ला दोन ब्रिज आहे ते बहुधा नव्याने येणाऱ्या पर्यटकांना किंवा प्रवाशांना माहिती नाही. यामुळे देवगड, कुणकेश्वर ला जाणारे बहुतेक प्रवासी नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली सर्व्हिस रोड ने येतात. हे का होते ? तर केवळ हायवे कंपनी ने दिशादर्शक फलक लावले नाहीत यामुळे हा मार्ग कुठे गेला हे समजण्यासाठी पर्याय नसतो मग ओटव फाटा ब्रिज खाली चौकशी केली की पुन्हा नांदगाव तिठा येथे मार्गस्थ होतात.यामुळे दोन्ही ब्रिज जवळ दोन्ही बाजूला दिशादर्शक फलक लावणे अत्यंत आवश्यक आहे.
उद्याच्या अंकात वाचा -
नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच ; भागात पूर्णतः अंधार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा