सिंधुदुर्ग today



नांदगाव येथील मुंबई गोवा महामार्गावरील समस्यांची ऐशी तैशी.

हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी लक्ष देईनात. 

उद्याच्या बातमीत वाचा - दिशादर्शक फलक लावण्यासाठी मुहूर्त सापडेना ; वाहनचालक कुणकेश्वर तसेच देवगड ला जाणारे येतात ओटव फाटा ब्रिज खाली

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

        कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील  नांदगाव येथील हायवे संदर्भात बरीच कामे प्रलंबित आहेत. याबाबत कित्येक वेळा हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी यांच्या येथे पाठपुरावा केला तरी संबंधित यंत्रणेला नांदगाव येथील हायवे संदर्भात प्रलंबित कामांसाठी मुहूर्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    नांदगाव शाळा नंबर 1 येथे दोन्ही बाजूला लावलेले सौर पथ दिवे बंद अवस्थेत आहेत. यामुळे या भागात पूर्णतः अंधार पसरलेला दिसत आहे. जर हायवे प्राधिकरण अथवा केसीसी कंपनीला अशा लावलेल्या पथदिव्यांचा  मेंटनस करायचा नसेल तर असे पथदिवे का लावले जातात ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे कित्येक प्रश्न आज नांदगाव येथील हायवेचे प्रलंबित आहे. या प्रश्नांकडे पूर्णतः सदर कंपनीने डोळेझाक केल्याचे दिसत आहे.

      या समस्या फक्त आणि फक्त हायवे कंपनी मुळेच प्रलंबित आहेत करण या समस्या बाबत कोणी ही हे काम करु नका अशी अडवणूक केली असल्याचे कंपनीने सांगावे . नांदगाव ओटव फाटा ब्रिज सर्व्हिस रोड समाधान बिअर शॉपी (बोरमाळ) दरम्यान खालील खोल भाग असल्याने अद्यापही संरक्षण कठडा केलेला नसल्याने वाहनधारकांना  धोकादायक स्थितीचा सामना करावा लागतो आहे. येथून सर्व्हिस रोड ला वळताना बोरमाळा असलेल्या कोपऱ्यात जाऊन अपघात होऊ शकतो.साधी पत्रा संरक्षण भिंत बांधावी अशी वाटली नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

उद्याच्या अंकात वाचा - दिशादर्शक फलक लावण्यासाठी मुहूर्त सापडेना ; वाहनचालक कुणकेश्वर तसेच देवगड ला जाणारे येतात ओटव फाटा ब्रिज खाली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today