सिंधुदुर्ग today



कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत संपन्न

नांदगाव सर्वसाधारण महिला राखीव.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज कणकवली कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली. यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण ५,नागरिकांचा मागास प्रवर्ग १७,नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ९,नागरिकांचा मागास प्रवर्ग ८,सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२,सर्वसाधारण महिला २१ अशी आरक्षण सोडत संपन्न झाली आहे.

     अनुसूचित जाती आरक्षण ५ यापैकी अनुसुचित जाती महिला नवीन कुर्ली, पिसेकामते, वाघेरी तर अनुसुचित जाती प्रवर्ग २ शिरवल, दारिस्ते , नागरिकांचा मागास प्रवर्ग १७ यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ९ यामध्ये कलमठ, ओझरम, लोरे, वागदे, खारेपाटण,  हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी,चिंचवली नागरिकांचामागास प्रवर्ग ८ नडगीवे, ओटव, ओसरगाव, कासार्डे, वरवडे, फोंडाघाट, बोर्डवे, आयनल सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ तर सर्वसाधारण महिला २१ यामध्ये असलदे, कळसुली, कळवण - तळवडे, कुरंगवणे, बेरले, कोंडये, कोळोशी, डांमरे, तळेरे, तीवरे, नांदगाव, पियाळी, हरकुळ खुर्द, भरणी, नाटळ, जाणवली, शिडवणे, नरडवे, आशीये, बेळणे खुर्द, घोणसरी, साळीस्ते तर सर्वसाधारण प्रवर्ग मध्ये करंजे, करूळ, कासरल, कुंभवडे, गांधीनगर, तोंडवली बावशी, दारूम, दिगवळे, नागवे, बिडवाडी, भिरवंडे माईन, वांयगणी, वारगाव, शेरपे शिवडाव, सांगवे, सातरल, हळवल हुंबरठ, सावडाव गावांचा समावेश आहे.

      यावेळी कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निरीक्षक आरती देसाई,नायब तहसीलदार मंगेश यादव , गंगाराम कोकरे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today