सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा अनधिकृत दुकान बांधकाम हटवण्यासाठी सुरुवात.

पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात 

कणकवली  (ऋषिकेश मोरजकर)

मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिथं येथे अनधिकृत असलेले दुकान बांधकाम गाळे तसेच उड्डाण वीज खाली असलेले स्टॉल हटाव मोहीम आज सकाळपासून सुरू झाली आहे. ही आता मोहीम आज 13 एप्रिल आणि उद्या 14 एप्रिल रोजी असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्वतः पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासहित पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली असून 

     पीडब्ल्यूडीचे अतुल शिवनिवार उप अभियंता कुमावत तसेच केसीसी चे कर्मचारी उपस्थित होते. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप  , पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , किरण मेथे , बावधाने, नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात होती.

     नोटिसा दिल्यानंतर आज पासून हटाव मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर व्यवसायिकांनी आपापली दुकाने काढण्यास स्वतः सुरुवात केली. सर्व असलेल्या साहित्य इतरत्र हलवून यंत्रणेला संपूर्ण सहकार्य करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today