सिंधुदुर्ग today
कणकवली शहरातील तो कृत्रिम धबधबा करण्यात आला सुरू - मुख्याधिकारी गौरी पाटील
कणकवली| ऋषिकेश मोरजकर
कणकवली गणपती साना येथे बाराही महिने वाहणारा कृत्रिम धबधबा आता सुरू करण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे. सध्या या धबधब्याच्या ठिकाणी लहान मुले आंघोळीचा आनंद लुटत आहेत . या धबधब्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले होते.उद्घाटन झाल्यानंतर काही महिने तांत्रिक अडचणींमुळे हा धबधबा बंद होता. पण या तांत्रिक अडचणी दूर करून आता हा धबधबा कणकवली वासीयांना खुला करण्यात आला असून सध्या याची वेळ सायंकाळी 5:30 ते रात्री 8 अशी ठेवण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले आहे.
त्यामुळे कणकवली शहरासह अन्य सर्वसामान्याना बाराही महिने वाहणाऱ्या धबधब्याच्या खाली आनंद लुटता येणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा