सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री. देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव ११ मे रोजी.
जत्रोत्सव नियोजन बैठक संपन्न ; जत्रोत्सवाची तयारी सुरू
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या नांदगाव येथे जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव यावर्षी रविवार दिनांक ११ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
यानिमित्ताने जत्रा नियोजनासाठी आज श्री देव कोळंबा मंदिर नांदगाव येथे श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाची नियोजन बैठक आज अध्यक्ष नागेश मोरये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
रविवार दिनांक ११ मे रोजी होणाऱ्या श्री देव कोळंबा वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने कार्यक्रम सकाळी ८ ते ९ पूजाविधी, सकाळी ९ ते २ नवस फेड करणे , दुपारी १२ ते ४ नवीन नवस बोलणे, सायंकाळी ४ ते ८ महाप्रसाद अशा प्रकारे जत्रोत्सव असणार आहे.
जत्रोत्सवात मटण भाकरीचा प्रसाद ;भाकरी पिठाचे नियोजन.
या जत्रोत्सवाचे विशेष म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांना दर्शन घेतल्यानंतर मटण व भाकरीचा प्रसाद दिला जातो. यामुळे जवळपास हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. यामुळे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात भाकरी च्या पिठाचे नांदगाव आणि परिसरात घरोघरी वाटप केले जाते. या बाबतीत सर्व नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा