सिंधुदुर्ग today
तोंडवली नर्सिंग कॉलेज तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांचे शंभर नंबरी यश.
नांदगाव |प्रतिनिधी
सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग बीएससी तोंडवली तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाचा निकाल १००% लागला.तर ८३•१४% गुण मिळवत जयेश मुंडये या विद्यार्थ्यांने महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नर्सिंग तृतीय वर्षाच्या पाचव्या सत्राच्या परिक्षेसाठी तोंडवली नर्सिंग कॉलेज मधून २७ विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.यामधील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.यामधून महाविद्यालयात अनुक्रमे जयेश मुंडये ८३•१४% , जान्हवी सासोलकर ८२•५३ , अंकीता हर्यान ८१•१४% गुण मिळवत महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थांच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी तोंडवलीचे अध्यक्ष वसंतजी सावंत, सचिव निखीलजी सावंत, प्राचार्या डॉ शकुंतला नागराज, संस्था प्रतिनिधी विनायक चव्हाण, वर्गशिक्षक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा