सिंधुदुर्ग today

चोरी करून पळणाऱ्या आरोपीला बारा तासात ठोकल्या बेड्या.

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची धडक कारवाई

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

चोरी करून पळणाऱ्या आरोपीला बारा तासातच बेड्या ठोकल्या असून कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी धडक कारवाई केली असल्याने कणकवली पोलीसांचे अभिनंदन होत आहे.

       याबाबत अधिक वृत्त असे की, कणकवली पोलीस ठाणे येथे दिनांक 01/04/2025 रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक 81/2025,BNS 2023 चे कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल असून याबाबत पोलीसात तक्रार हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण, व्यवसाय कन्स्ट्रक्शन,राहणार-विद्यानगर कणकवली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. चव्हाण यांच्या  कन्स्ट्रक्शन साइटवर मागील पंधरा दिवसापासून काम करणारा मूळ नेपाळ देशाचा असणारा कामगार रंजीत शंकर पैसवाल हजरा तुसाद, वय 28  वर्षे,राहणार नेपाळ देश याने फिर्यादी यांचे घरातील रोख रक्कम 47,000/- तसेच 5.5 ग्रॅम वजनाची सोन्याची कुडी,4 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून फिर्यादी यांची बजाज डिस्कवर मोटरसायकल क्रमांक MH07 Y 8178 ही घेऊन दिनांक 31/3/2025 रोजी पळून गेलेला होता.फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यास तक्रार देताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा फोटो किंवा मोबाईल क्रमांक,त्याचा राहण्याचा पत्ता अशी कोणतीही माहिती नसताना चातुर्याने त्याचे मोबाईल क्रमांक गोपनीय माहितीगाराकडून प्राप्त करून त्याचे लोकेशन घेऊन व सीसीटीव्ही मधून त्याचे छायाचित्र प्राप्त केले.तदनंतर आरोपी हा पनवेल रेल्वे स्थानक या ठिकाणी असलेबाबत त्याचे मोबाईल लोकेशनद्वारे समजल्याने तात्काळ कणकवली रेल्वेचे पोलीस निरीक्षक श्री सुरवडे यांचे मदतीने पनवेल रेल्वे पोलिसांची मदत घेऊन आरोपी नेपाळ येथे पळून जाण्याचे तयारीत असतानाच त्याला रेल्वे पोलिसांचे मदतीने संयुक्त कारवाई करून पनवेल रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणले.पोलीस ठाणे येथे आणल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सर्व दागिने (सोन्याची कुडी,दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम 44,000/- रुपये) हे हस्तगत करण्यात आले. तपासामध्ये त्यांनी चोरून नेलेली मोटरसायकल ही देखील  ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलीस करीत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार 859/ विनोद सुपल हे करीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक श्री कृषिकेश रावले,पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल हाडळ,PC 681/ पाटील,PC 499/ पाटील यांनी केलेली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today