सिंधुदुर्ग today
रामेश्वर पेट्रोल पंप असलदे यांच्यावतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्राहक म्हणून आप्पा इंदप यांचा सत्कार
कणकवली प्रतिनिधी
रामेश्वर पेट्रोल पंप असलदे यांच्यावतीने वर्षातील सर्वोत्कृष्ट ग्राहक म्हणून कृष्णाजी उर्फ आप्पा इंदप यांची निवड करण्यात आली.गुढीपाडव्याचे औचित्य साधून आप्पा इंदप यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व कंपनीच्या वतीने प्रभू रामचंद्र व पादूकांची प्रतिमा भेट दिली.
गुढीपाडव्याचे औचित्य साधून असलदे येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या रामेश्वर पेट्रोल पंप कडून यावर्षीपासून ग्राहक व कंपनी यांच्यामध्ये विश्वासाची गुढी उभारण्याची सुरवात यावर्षीच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.वर्षभरातील सर्वोत्कृष्ट ग्राहक ठरलेले कोळोशी येथील आप्पा इंदप यांनी रामेश्वर पेट्रोल पंपाशी केलेले प्रामाणिक व्यवहार, विश्वास पाहता कंपनी व रामेश्वर पेट्रोल पंप असलदेचे मालक पाताडे परिवार यांनी सर्वोत्कृष्ट ग्राहक आप्पा इंदप यांचा सत्कार केला.
यावेळी रामेश्वर पेट्रोल पंपचे मालक राजन पाताडे, युगंधर पाताडे, आप्पा इंदप, जयप्रकाश पाताडे,सौ.विभा पाताडे,असलदे पोलिस पाटील सविता पाताडे, कणकवली पत्रकार संघाचे सहसचिव उत्तम सावंत,राणे सर, मिलिंद तांबे, शामराव परब, संतोष घाडी,दिपक इंदप,विनीत इंदप,भाऊ गोरुले,अक्षय परब,रुपेश परब आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजन पाताडे म्हणाले की, ग्राहक व रामेश्वर पेट्रोल पंप यामधील विश्वासाहर्ता कायम रहावी यासाठी आम्ही व आमचे कर्मचारी पुरेपूर प्रयत्न करत आहोत.हाच विश्वास कायम राहील याची खात्री देतो.तर या कामात आमचे ग्रामस्थ आम्हाला माझ्या असलदे ग्रामस्थ व मित्रपरिवार यांचे मोठे सहकार्य लाभत आहे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजन पाताडे तर आभार सौ.विभा पाताडे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा