सिंधुदुर्ग today



गुरे वाहतूक करणारा महिंद्रा पिकप बेळणे येथे बजरंग दलाने पकडला.

पोलीस निरीक्षक मारुती जगताप घटनास्थळी पोलीस फौजफाटा सहीत दाखल.

नांदगाव | प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील एका ग्रामीण भागातून नांदगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गावरुन कणकवली च्या दिशेने गुरे वाहतूक करणारा एक घाट माथ्यावरील महिंद्रा पिकप बेळणे येथील लता नगरी दरम्यान पाठलाग करत बजरंग दलाने पकडला असून यात काही गुरे आढळून आल्याने संतप्त बजरंग दल तसेच जमाव वाढू लागला दरम्यान याबाबत कणकवली पोलीस यांना माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री शेडगे यांच्या सहीत पोलीस फौजफाटा दाखल झाल्याने सदर गुरे वाहतूक करणाऱ्या टेम्पो सहीत चालकाला कणकवली पोलीस ठाण्यात अधिक तपासासाठी आणण्यात आले. दरम्यान यावेळी उपस्थित सर्वांनी सदर गुरे गो शाळेत देण्यात यावी. आणि आरोपी वर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. सदर घटना आज सकाळी १०.४५ च्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर बेळणे लता नगरी दरम्यान घडली.

      यावेळी बजरंग दलाचे सागर डंबे , निखिल पिसे, तेजस भांबुंरे श्री खरात, अमोल गावकर, प्रदीप हरमलकर,श्रीकृष्ण वायंगणकर, प्रतिक भाट आदी बहुसंख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते.

    घटनेची माहिती मिळताच नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर, बेळणे उपसरपंच पंढरीनाथ चाळके,बेळणे पोलीस पाटील श्री चाळके आदी दाखल झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today