सिंधुदुर्ग today


कासार्डेतील संजय नकाशे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार जाहीर 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

    कणकवली तालुक्यातील कासार्डेतील संजय नकाशे यांना राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.

       एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगाव व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगाव याच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला जाणारा राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्कार कासार्डेतील माजी तंटामुक्त अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय नकाशे याना जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे वितरण रविंद्र भवन,साखळीन गोवा येथे २७ एप्रिल २०२५ रोजी होणार असून यावेळी वरील पाच राज्यातील मान्यवरांच्या हस्ते श्री. संजय नकाशे याना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल संजय नकाशे याचे सर्वच स्तरावर कौतुक होत अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today