सिंधुदुर्ग today
तोंडवली नर्सिंग कॉलेज द्वितीय वर्षाचा निकाल १००%
नांदगाव/प्रतिनिधी
श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग बीएससी द्वितीय वर्षाचा निकाल १००% लागला असून साक्षी गवस हिने ८६% गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला .
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बीएससी नर्सिंग परिक्षेसाठी श्री सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग मधून द्वितीय वर्षात एकूण २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.यामधून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले .यामध्ये साक्षी विजय गवस ८६% शिवानी संतोष बागवे ८४•५७% सुहाणी सुहास कुंभार ८३•४२ यांनी अनुक्रमे महाविद्यालयात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तर प्रथम वर्षातील प्रथम व द्वितीय सत्रातील बीएससी नर्सिंग कॉलेजचा निकाल अनुक्रमे ८९•४७ व ९६•०६% लागला असून प्रथम वर्ष प्रथम सत्रात दिपश्री दिलीप सावंत ८३•२% प्रथम,रुतल दिनेश कुपेरकर ८० % द्वितीय तर महिमा संतोष तावडे ७९•२% गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.तर प्रथम वर्ष द्वितीय सत्रातील निकाल ९६•६% लागला असून नेहा नारायण चव्हाण ८५•७१% , वैष्णवी राकेश रसाळ ८२•८५%,उमेश पांडूरंग झोरे ८२•२८% गुण मिळवत महाविद्यालयात अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल संस्था अध्यक्ष वसंतजी सावंत सचिव निखील सावंत, प्राचार्या डॉ शकुंतला नागराज, संस्था प्रतिनिधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा