सिंधुदुर्ग today
नांदगाव तिठा अनधिकृत दुकान बांधकाम हटविणे काम केले बंद
हायवे प्राधिकरण ने हद्द निश्चित करावी नंतरच अतिक्रमण हटवावे ; गाळ्याधारकांची मागणी.
डि.वाय एस.पी. आढाव यांची नांदगाव ला भेट; पोलीस छावणीचे स्वरुप.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव तिटा येथे अनधिकृत असलेले दुकान बांधकाम गाळे तसेच उड्डाण वीज खाली असलेले स्टॉल हटाव मोहीम आज सकाळपासून सुरू झाली होती .काही दुकाने हटविण्यात आली. नंतर काही पुढील अतिक्रमणे हटविताना उपस्थित गाळ्या धारकांनी आक्षेप घेत अनधिकृत असलेली सर्वच बांधकामे हटवावीत अशी जोरदार मागणी करत जोपर्यंत हायवे प्राधिकरण हद्दी निश्चित दाखवित नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवावी अशी मागणी केली. दरम्यान अनधिकृत दुकान बांधकाम हटविणे हे ४ दिवसांसाठी मोहीम स्थगित ठेवण्यात आली असून या कालावधीत हायवे प्राधिकरण व भुमी अभिलेख विभागा मार्फत हद्द निश्चित करण्यात येणार असून यानंतर पुढील मोहीम राबविण्यात येणार असल्याचे हायवे प्राधिकरण चे उप अभियंता अतुल शिवनिवार यांनी बोलताना सांगितले आहे.
यावेळी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याने नांदगाव तिठा येथे पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. स्वतः पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासहित पोलिसांची कुमक तैनात होती.
डी. वाय. एस. पी.घनश्याम आढाव यांची भेट
या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही नांदगाव येथे भेट देत पाहणी केली.
यावेळी हायवे प्राधिकरण चे अतुल शिवनिवार , उप अभियंता कुमावत तसेच केसीसी चे कर्मचारी उपस्थित होते. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप , पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , किरण मेथे , बावधाने, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात होती.
यावेळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती नागेश मोरये, नांदगाव तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजा नावलेकर, शिवसेना उबाठाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजिद बटवाले, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर,यासिर मास्के,तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा