सिंधुदुर्ग today



नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे डिसेंबर च्या अपघातानंतर बंदच ; भागात पूर्णतः अंधार 

आंदोलन नोटीस दिल्याशिवाय कंपनीला जाग येईना 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

 कणकवली तालुक्यातील नांदगाव मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या गावातील हायवे संदर्भात प्रलंबित कामांवर प्रकाश झोत टाकला जात आहे.

आजच्या न्यूज मध्ये पहाणार आहोत नांदगाव ओटव फाटा ब्रिज खाली जवळपास २० ते २५ गावाचं प्राथमिक आरोग्य केंद्र असून ही या भागात हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

येथे पथ दिवे सुरुवातीला लावण्यात आले होते. परंतु ट्रांसफार्मर साठी जागा उपलब्ध होत नव्हती नंतर सरपंच भाई मोरजकर यांच्या मध्यस्थीने अमोल गावकर यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली.

यानंतर स्ट्रीट लाईट सुरूही झाली .दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये शाळेतील सहल बस चा अपघात नांदगाव ओटव फाटा ब्रिज वर होत एस टी कठड्याला आदळून स्ट्रीट लाईट बंद पडल्या होत्या. त्यापासून संबंधित विभागाला वारंवार याबाबत सूचना करूनही त्याची दखल अद्यापही घेतलेली नाही यामुळे भागात यामुळे पूर्णतः अंधार पसरलेला आपल्याला दिसत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today