सिंधुदुर्ग today
लक्झरी बस मधून बॅक लिफ्टिंग करून वारंवार दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना केले गजाआड.
मुंबई गोवा महामार्गावरील असलदे येथील हॉटेल दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कारवाई.
कणकवली (विशेष प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बस मधून बॅक लिफ्टिंग करून वारंवार त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करून घेऊन पलायन करणार्या चोरट्यांना काल रात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी शिताफीने जेरबंद केले आहे.
सदर कारवाई काल रात्री मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव नजिक असलेल्या असलदे ग्रीन फील्ड हॉटेल येथून केली. असल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जाहीर निजामुद्दीन खान वय 40 राहणार ,जाहीर याकूब खान वय 40, रब्दर सोजर हुसैन, रफिक नियाज खान सर्व राहणार मध्य प्रदेश यांना ब्रिझा कारसह ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सहाय्यक पोलीस पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड , पोलीस कॉन्स्टेबल डॉनिक डिसोजा ,सदानंद राणे, प्रमोद कळसेकर, किरण देसाई, बस्त्याव डिसोजा,आशिष जामदार व चंद्रकांत पालकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
तसेच नमूद आरोपींना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी मुंबई गोवा हायवेवर कणकवली येथील असलदे, नांदगाव व ओसरगाव येथे लक्झरी बस मधून बॅग लिफ्टिंग करून सोने व रोख रक्कम चोरून घेऊन गेल्याचे कबूल केले नमूद चारही आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील असून आपल्या राहत्या ठिकाणावरून साथीदारांचा स्वतःच्या मालकीचे चार चाकी वाहने इत्यादी सारख्या वाहनाने निघून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लक्झरी बसेस थांबा असलेल्या हॉटेलच्या ठिकाणी बसमधील प्रवाशांच्या बॅगांची रोख रक्कम व मौल्यवान वस्तूंची चोरी करतात त्या अनुषंगाने वरील चारही आरोपींच्या गुन्हा पद्धतीनुसार ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व परराज्यात आवश्यकतेनुसार पत्रव्यवहार करण्यात येत असून पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा