सिंधुदुर्ग today
नांदगाव विविध संघटनांच्या वतीने दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून करण्यात आला तिव्र निषेध
पाकीस्तान झेंडा जाळून व्यक्त केला निषेध
मुर्दाबाद मुर्दाबाद पाकीस्तान मुर्दाबाद च्या घोषणा
कणकवली |प्रतिनिधी
मुर्दाबाद मुर्दाबाद पाकीस्तान मुर्दाबाद ,निम का पत्ता कडवा है पाकिस्तान भडवा है ,भारत माता की जय, वंदे मातरम् ,जय जवान जय किसान आदी घोषणांनी नांदगाव तिठा परिसर आज दुमदुमून गेला.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्यात निष्पाप नागरिकांचे बळी गेले या भ्याड हल्याच्या निषेधार्थ नांदगाव व्यापारी संघटना ,रिक्षा संघटना, तसेच नांदगाव दशक्रोशीतील नागरीकांच्या वतीने आज नांदगाव तिठा ब्रिज खाली काळ्या फिती लावून तिव्र निषेध करुन निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. तसेच पाकीस्तान झेंडा प्रती जाळून तिव्र निषेध करण्यात आला आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर,नांदगाव आदर्श व्यापारी संघटना उपाध्यक्ष रज्जाक बटवाले ,सचिव ऋषिकेश मोरजकर, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरी वायंगणकर,श्री संतोष जाधव, किशोर दाभोलकर, संजय पाताडे, प्रदीप हरमलकर, संतोष मिराशी,सेवानिवृत्त पोलिस हवालदार गवस साटविलकर, तात्या निकम, राजा म्हसकर , निलेश तळेकर,अनिकेत तर्फे , श्रीकृष्ण वायंगणकर, विठोबा कांदळकर, अब्दुल नावलेकर, इक्बाल बटवाले, यासिन बटवाले, पांडू तेली ,अनिल बांदेकर, आसिफ बटवाले राजू खोत ,मारुती मोरये, सुरेश मोरजकर , श्रीकांत टाकळे आदी बहुसंख्येने व्यापारी, रिक्षा संघटना पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सहीत पोलीस फौजफाटा तैनात होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा