सिंधुदुर्ग today
फोंडाघाट येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कणकवली प्रतिनिधी
आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती मोहत्सवा निमित्त फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ, फोंडाघाट व भारतीय बौद्ध महासभा शाखा फोंडाघाट यांच्या मार्फत तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दि.13एप्रिल 2025 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम क्र.₹1000/-द्वितीय क्र.₹750व तृतीय क्र.₹500 असे आहे. स्पर्धेसाठी खालील विषय देण्यात आले आहेत.
1)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण
2)म. ज्योतीराव फुले यांचे शिक्षणं व कार्य
3)म. ज्योतीराव फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर -एक शैक्षणिक परिवर्तन
स्पर्धा रविवार दि.13एप्रिल सकाळी 10 पासून चालू होईल स्पर्धेत जास्तीस जास्त मुलांनी सहभागी व्हावे असे मंडळाच्या अध्यक्षा सुचिता जाधव व सचिव प्रा. संतोष आखाडे यांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा