पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या कासार्डे जि.प.गटातील असलदेत होणार प्रचार सभा. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणेंची उपस्थित राहणार  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)  केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दिनांक 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वा. महायुतीची कासार्डे जिल्हा परिषद गटातील प्रचार सभा गौरी मंगल कार्यालय असलदे येथे आयोजित करण्यात आली आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणे,व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कासार्डे जिल्हा परिषद गटात नारायणराव राणेंच्या प्रचार सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.        तरी कासार्डे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद मेस्त्री,हर्षदा वाळके, संजय देसाई, पंढरी वायंगणकर, भाई मोरजकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
मुख्यमंत्री होण्या आदी ठाकरे चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी कधीही गेले ते दाखवा. भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांचा घणाघात ठाकरेंना महापौर बंगल्यावर तासंतास बसण्यास वेळ होता कणकवली |प्रतिनिधी  मुख्यमंत्री होण्या अगोदरचा चैत्यभूमीवर अभिवादन करतानाचा उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी फोटो दाखवावा.हाकेच्या अंतरावर असलेल्या महापौर बंगल्यावर तासंतास बसण्यास वेळ होता. पण कधी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय तिथे गेले. अन्यथा ते कधीही गेले नाहीत.याचे कारण देखील त्यांनी सांगावे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल काय विचार आहेत.? हे सुध्दा जाहीर करावे. अन्यथा आम्हाला पुराव्यासकट तोंड घडल्यास फारच मागत पडेल. अशी टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.   संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असले

सिंधुदुर्ग today

इमेज
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मुस्लिम समाज प्रचारात सक्रिय हुमरठ,साकेडी येथील मुस्लिम समाज पुढे सरसावला  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा बैठकांचा धडाका सुरू कणकवली; प्रतिनिधी  राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील गाव हुमरठ व  साकेडी येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार  ना. नारायण राणे  प्रचारार्थ बैठका घेतल्या. यावेळी उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते. तर साकेडी येथे सुद्धा  मुस्लिम समाज बांधवांनी नारायण राणे यांना विजयी करण्याचा निर्धार केला यावेळी उपसरपंच जहुर शेख, अकबर शेख, अझहर शेख, दिलदार शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
  ...जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही,* तोपर्यंत कुठल्याही राजकीय  पक्षांनी प्रचारासाठी येऊ नये...! ग्रामस्थांनी केला निर्धार; बॅनर मधून वेधले लक्ष! शिरवल गावच्या प्रवेशद्वारावर प्रचारासाठी प्रवेश बंदीचा लावण्यात आला फलक. कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेला शिरवल गावातील मुख्य रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. ३० वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आलेला हा रस्ता आता मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याचे काम सुरू होईल या भाबड्या आशेवर मात्र शिरवल ग्रामस्थ प्रतीक्षेत आहेत. रस्त्याचे डांबरीकरणाचे  काम मंजूर असुन निविदा काढण्यात आली आहे.कार्यारंभ आदेश मिळून सुद्धा एप्रिल महिना संपत आला तरी शिरवल गावच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होत नसल्याने शिरवल ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून सर्व पक्षीयांचा तीव्र  शब्दात निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत शिरवल मध्ये जाण्यासाठी रस्ता डांबरीकरण करुन मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी बॅनरच्या माध्यमातून केली आहे.  शिरवल

सिंधुदुर्ग today

इमेज
फोंडाघाट विभागातील येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड, यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले. यावेळी मनोज राव राणे, राजन चिके, मामा हळदीवे, संजय आग्रे, संतोष कानडे, सुरेश सामंत, सुजाता हळदिवे, संजना आग्रे आदि भाजप उपस्थित होते..

सिंधुदुर्ग today

इमेज
लोरे नं.२ येथील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांनी केला भाजपात प्रवेश. कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील लोरे नं२  येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले. यावेळी दिलीप राव राणे, बंटी राव राणे आदि भाजप उपस्थित होते..

सिंधुदुर्ग today

इमेज
वैभववाडी लोरे नं.2  उ.बा.ठा च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या लोरे गावातील  विकास कामांचा धडाका पाहून पक्षप्रवेश कणकवली : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.2 मधील युवा कार्यकर्ते मंदार रावराणे,तेजस रावराणे , वैभव रावराणे, संजय रावराणे, महादेव रावराणे, रुपेश रावराणे, स्वागत रावराणे, प्रणय रावराणे, अक्षय रावराणे, सचिन रावराणे,अभय रावराणे,सुधाकर रावराणे, अमित रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातीलठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे यांच्या सोबत भाजप पदाधिकारी दिलीप रावराणे, रितेश सुतार, पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
अनाथ निराधारांचे हक्काचे आश्रयस्थान म्हणजे पणदूर येथील सविता आश्रम - राजेंद्र पेडणेकर  माऊली मित्र मंडळ कणकवली च्या वतीने पणदूर आश्रम येथे 200 निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप  संदीप परब अनाथांचे  देवदूत  आणि आधारवड कणकवली दि २९ एप्रिल ( ऋषिकेश मोरजकर) जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर  पूर्वी इतक्याच जिव्हाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड बनण्याचे काम करत असुन आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने प्रेरित होऊन  जीवन आनंद संस्था काम करत आहे..असे गौरवोद्गार माऊली मित्र मंडळ कणकवली चे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी काढले.  ते कुडाळ तालुक्यातील पणदूर आश्रम येथे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माऊली मित्र मंडळाचे प्रदीप मसुरकर, अविनाश गावडे ,सुभाष उबाळे, भगवान कासले , यांच्यासह पणदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील हरेश वालावलकर राजेंद्र राणे गजानन घाडी राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते.        माऊली मित्र मंडळ कणकवली च्या वतीने पणदूर आश्रम येथील 200 निराधारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.तसेच मुलांना खेळण्यासाठी विशेष भेट म्हणून नवीन कॅरम बोर्ड प्रदान करण्या

सिंधुदुर्ग today

इमेज
  लोरे येथे महायुतीचे उमदेवार श्री. नारायण राणे यांच्या प्रचाराची झंजावाती सुरुवात... घरोघरी जावून शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली मतदारांची भेट  कणकवली : -  कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 येथे  भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे  यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर येथे श्री फळ वाढवून करण्यात आली. यासाठी कणकवली विधानसभा अध्यक्ष श्री. मनोज रावराणे. कृषि उत्पन्न बाजारसमिती सभापती श्री. तुळशीदास रावराणे. लोरे घोणसरी शक्ती केंद्र प्रमुख श्री नरेश गुरव, लोरे सरपंच श्री अजय रावराणे उप सरपंच श्री सुमन गुरव,    श्री. जगदीश बाबर (सोलापूर) श्री.प्रभाकर रावराणे, श्री अनंत रावराणे, श्री. प्रकाश रावराणे श्री अलंकार रावराणे श्री सुनील रावराणे श्री कृष्णा गुरव श्री अनिल रावराणे, श्री महेश रावराणे श्री चिन्मय रावराणे श्री संजय खाडये श्री बाबू खाडये, श्री संतोष मोसमकर, श्री रामचंद्र मोसमकर, श्री आबू गुरव,श्री मनोहर गुरव, श्री सुनील गुरव, श्री सुभाष गुरव श्री सुरेश शिरोडकर, श्री सतीश कासले, श्री सदा नापणेकर,श्री सोन्या धुरी, श्री अमित दळवी, श्री राजेंद्र कोलते, श्री बाळकृष्

सिंधुदुर्ग today

इमेज
बिडवाडी माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश कणकवली : कणकवली तालुक्यातील बीडवाडी येथील माजी विभाग प्रमुख दिलीप उर्फ दादा भोगले यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बीडवाडीला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे, संदेश सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, राजू हिरलेकर, दत्ता काटे आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
सावडाव उ.बा.ठा चे उपविभाग प्रमुख व सावडाव माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र  आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव येथे चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश   कणकवली/प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सावडावला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी आमदार नितेश राणे , संदेश सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत उत्तम वारंग सिद्धेश लोके अशोक वारंग आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
वैभववाडी - सोनाळी वाणीवाडी येथील उबाठा गटाचे गटप्रमुख महेंद्र पाडावे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजपात प्रवेश. कणकवली / प्रतिनिधी  वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते सत्यवान सुतार, संकेत नर, महेंद्र पाडावे, रघुनाथ पाडावे, रुपेश बोभाटे, विशाल पाडावे ,आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सोनाळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले. यावेळी अरविंद रावराणे, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश शेलार, बूथ प्रमुख समाधान जाधव, आदि भाजप उपस्थित होते..

सिंधुदुर्ग today

इमेज
कवयित्री योगिता शेटकर यांचे पणजी आकाशवाणीवर १ मे रोजी कविता वाचन कणकवली/प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पकालावधीत नावलौकिक मिळवलेल्या कवयित्री योगिता शेटकर यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम १ मे रोजी सायं. ५.३० वा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादाई केंद्रावरून प्रसारित होणार आहे.        कवयित्री योगिता शेटकर यांचे यापूर्वी आकाशवाणीवर कविता वाचन प्रसारित झाले आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र, दिवाळी अंकात त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा 'करुणेचा प्रवाह' काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यातील कवितेला कवितेच्या जाणकारांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. कवितेसाठी त्यांना राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत. तरी सदर कविता वाचनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस  रूट मार्च. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) आगामी लोकसभा निवडणूक  च्या अनुषंगाने मतदार याने निर्भयपणे मतदान करावे या करीता कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कणकवली  बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक,एस टी,स्टँड, पटवर्धन चौक, इत्यादी गर्दीचे ठिकाणी आज रूट मार्च घेण्यात आला.       सदर रूट मार्च करिता 05अधिकारी, 60 अमंलदार (01 BSF प्लाटूनसह), १५ उपस्थित होते.     यामध्ये एक.पी.आय. मनोज पाटील ,पी.एस.आय. अनिल हाडळ,पी.एस.आय सागर शिंदे,हवालदार नानचे, पोलीस नाईक - मनोज गुरव, चंद्रकांत माने,पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे ,राज आघाव,राजाराम पाटील आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

अशी चुक पुन्हा करणार नाही  नांदगाव मधली वाडी येथील महापुरुषांच्या चरणी झाला नतमस्तक  सहा महिन्यापूर्वी एक स्क्रॅप विक्रेता जुने स्क्रॅप घेऊन ही पैसे न देता केले होते पलायन  आता स्क्रॅप ची झालेली रक्कम महापुरुष चरणी केली अर्पण   नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) श्री महापुरुष प्रसन्न असं म्हटलं की आपण आपल्या वाडीतील देवा जवळ आहोत असे वाटते आज अशी सत्य घटना घडली की तुमचाच काय सर्वांना यांचा आनंद वाटेल सहा महिन्यापूर्वी एक स्क्रॅप विक्रेता नांदगाव मधली वाडी महापुरुष हॉलचे काम चालू असताना वाडीतील प्रमुख युवकांनी त्याला खराब झालेलं लोखंड ३८०० रु दिले व तो स्क्रॅप वाला ओळखीचा होता म्हणून एक तासाने आणून देतो असे सांगून गेला. तो गेला तो आलाच नाही .सगळीकडे शोधून चौकशी करून त्यांचा पत्ता लागत नव्हता आणि आज सकाळी अचानक 10 वाजता तो आपल्या कुटुंबासहित महापुरुषाच्या पारा जवळ हजर झाला त्याचे आई-वडील व तो मुलगा हात जोडत विनवणी करत आमचं चुकलं हे तुमचे पैसे घ्या आणि झालेल्या चुकीची आम्ही क्षमा मागतो . महापुरुषाच्या जवळ येऊन त्यांनी पाच फळ, केळी, चार हजार रुपये ,नारळ, अगरबत्ती ठेवून झालेल्या चुकीची नाक घासून क्षमा

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ. कणकवली प्रतिनिधी  केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आठवडा बाजार असल्याने येथे श्रीळफ वाढवून प्रचाराचा शुभारंभ भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.      यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष रज्जाक बटवाले, माजी सरपंच संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच निरज मोरये,ओटव सरपंच रुहिता तांबे, नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले , संतोष जाधव,कमलेश पाटील, हरिश्चंद्र बिडये, मंगेश बोभाटे, अवधूत गगनग्रास, तोसीम नावलेकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, अनिकेत तांबे, राजू तांबे,संतोष बिडये,शंकर मोरये, जैबा नावलेकर,अक्षता खोत, पुजा सावंत, नमिता मोरये,गवस साठविलकर , मंगेश पाटील,यासिर मास्के, आयनल माजी सरपंच बापू फाटक, कोळोशी माजी सरपंच सुशिल इंदप,मुबारक साठविलकर, गंगाधर बोभाटे, राजू खोत, शामराव परब ,वसीम साठविलकर ,आदी बहुसंख्येने भाजपा पदाधिकार

सिंधुदुर्ग today

इमेज
  सिंधुदुर्गातील दिव्यांग गुणी कवीचा पुण्यात गवगवा कवी सफरअली यांच्या कवितांना अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांनी लावले चारचाँद! कणकवली/ऋषिकेश मोरजकर      सिंधुदुर्ग मधील नामवंत दिव्यांग कवी सफरअली इसफ म्हणजे साहित्यक्षेत्रातील अजातशत्रू. त्यांची कविता म्हणजे आजच्या धर्मांध शक्तींवर प्रहारच. मराठी कवितेत आजवर न लिहिले गेलेले धाडसी अनुभव त्यांनी आपल्या कवितेत शब्दबद्ध केले. आणि या कवितेला पुण्यातील अभिजात रसिकांनीही जोरदार प्रतिसाद दिला. निमित्त होते ते अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, आणि नामवंत कवयित्री अंजली ढमाळ यांनी सफरअली यांच्या 'अल्हाह ईश्वर' काव्यसंग्रहामधील कवितांचे प्रभावी केलेले सादरीकरण!        राष्ट्र सेवा दलने पुणे साने गुरुजी स्मारकात आयोजित केलेल्या त्यांच्या पहिल्याच अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त सदर कविता सादरीनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाहेर पाऊस पडत होता आणि सभागृहात अर्थवाही भाववाही कविता सादरीकरणाने श्रोते कवितेत चिंब न्हाऊन निघाले होते.यावेळी अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाच

सिंधुदुर्ग today

इमेज
देवगड - निपाणी महामार्गावर तोंडवली येथे दोन वाहनांच्या धडकेत एक जखमी; वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  नांदगाव  : प्रतिनिधी       देवगड निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथील हनुमान मंदीर नजीकच्या धोकादायक वळणावर चार चाकी व मालवाहू टेम्पो याच्यात  अपघात होत एक बाळ आणि एक स्त्री आणि एक पुरुष असे मिळून तिघांना दुखापत झाली.तर दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदर अपघात आज ( २४ एप्रिल ) रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडला. दरम्यान जखमींना कवी - पत्रकार अजय कांडर यांनी नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले.     नांदगाव वरून फोंडाघाटच्या दिशेने जाणारी चारचाकी कार व फोंडाघाट वरून नांदगावच्या दिशेने जाणारा मालवाहू टेम्पो तोंडवली बोभाटेवाडी येथील धोकादायक वळणावर आले असता वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे समजते.मात्र नेमका अपघात कसा घडला याची माहीती मिळु शकली नाही. अपघातानतंर काहीकाळ वाहतूक ठप्प होती. मात्र स्थानिकांनी मदतकार्य करीत वाहतूक पूर्ववत केली. उशिरापर्यंत या अपघाताची पोलिसात नोंद नव्हती.

सिंधुदुर्ग today

इमेज
ओटव फाट्यावरील पथदिवे अर्धे चालू तर अर्धे बंद स्थितीत. गेल्या 15 दिवसांपासून सुचना करुन ही कंपनी कडून दखल नाही. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथदिवे अर्धे चालू तर अर्धे बंद स्थितीत आहेत. याबाबत वारंवार सुचनाही केली असून ही दुर्लक्ष होत आहे.                  नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे लावून जवळपास वर्ष दोन वर्ष लोटली परंतु ट्रांसफार्मर उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. यानंतर सरपंच भाई मोरजकर यांनी मध्यस्थी करून जवळच असलेल्या अमोल गावकर यांना याबाबत जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली असता त्यांनी संमती देवून जवळपास गेल्या श्री गणेश चतुर्थी पासून काम सुरू होते.नंतर ते दिपावली ला सदर पथदिवे सुरू करण्यात आले. मात्र काही दिवसांतच काही  पंथ दिवे बंद स्थितीत आहेत.याबाबत संबंधित यंत्रणेला सांगूनही अद्यापही संबंधित केसीसी कंपनीने याबाबत दुर्लक्ष केले आहे.नांदगाव च्या नागरीकांना प्रत्येक हायवे च्या प्रलंबित कामांना आंदोलनच करायची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल सर्व सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
असलदे सरपंच चंद्रकांत डामरे व उपसरपंच सचिन परब यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र ! भाजपा नेते विनोद तावडे व आमदार नितेश राणेंच्या उपस्थित केला भाजपमध्ये प्रवेश.  नांदगाव पंचायत समिती विभागातील उबाठा सेनेला दुसरा धक्का. कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच चंद्रकांत डामरे यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नांदगाव पंचायत समिती विभागातील उबाठा सेनेला दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी ही उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपचे नेते विनोद तावडे व आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता कोळोशी लगत असलेल्या असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी ही आज भाजपाचे कमळ हाती घेतल्याने ठाकरे सेनेला दुसरा धक्का बसला आहे.        शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असलदे सरपंच श्री.चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब,विभागीय शाखा संघटक मनोज लोके,विजय खरात, सचिन हरमलकर,प्रवीण डगरे,हर्षद परब, विजय वरक यांच्यासह असलदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय

सिंधुदुर्ग today

इमेज
उबाठा सेनेचे लोकसभेतील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा तोंडवली येथे शुभारंभ कणकवली प्रतिनिधी  उध्दव बाठासाहेब ठाकरे शिवसेना  पक्षाचे लोकसभेतील उमेदवार  श्री. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील तोंडवली येथील आई पावणादेवी चरणी नतमस्थक होऊन मोठ्या मताधिक्याने निवडून यावे असे साकडे घालून श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला आहे. सर्व पदाधीकारी व शिवसैनिक ग्रामस्थ यांनी निर्धार केला व प्रचाराला सुरुवांत केली पुन्हा एकदा  श्री. खासदार विनायक राऊत यांना निवडुन येण्यासाठी  पावणादेवी चरनी सांगणे करून प्रचाराला सुरुवांत एकमताने करण्यात आले.  यावेळी तात्या निकम ऊ. विभाग प्रमुख,ग्रा. पं. सदस्य मनश्री कांडर, सो .सा. व्हाईस चेअरमन अतुल सदडेकर,युवा सेना ता प्रमुख प्रकाश आबु मेस्त्री,हेमंत कांडर, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत बोभाटे ,सौ सुप्रीया बोभाटे,सांक्षी बोभाटे,सुप्रीया खडपे,स्वराली बोभाटे, सुप्रीया रांबाडे, संजय नाडकर्णी, बाळा नाडकर्णी,गणेश गुरव,संतोष तेली,आबा तेली,दिपक कांडर,रामा निकम,सुनिल निकम,समीर निकम,अक्षय निकम,किरण निकम,सुरेश निकम,मिलींद चव्हाण,निलेश कदम,सं

सिंधुदुर्ग today

इमेज
  सफरअली यांची कविता सगळ्या शोषितांना एकत्र बांधते अभ्यासक प्रा वंदना फलसाने कवी अजय कांडर यांच्या हस्ते 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन राष्ट्र सेवा दलतर्फे पुण्यात साहित्य नाटक चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशन सोहळा. कणकवली/ऋषिकेश मोरजकर        कवी सफरअली इसफ यांची कविता आजच्या भारतीय मुस्लिम वर्गाच्या कोंडीच प्रतिनिधित्व करत असली तरी ती  सगळ्या अल्पसंख्यांक शोषित वर्गांच्या वेदनेला एकत्र बांधते. ही कविता भारतीय पातळीवर पोहोचायला हवी. ती विविध भाषेत भाषांतरित होऊन तिला बहुमुखी वाचक लाभायला हवा एवढी त्या कवितेची गुणवत्ता मोठी आहे असे आग्रही प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.वंदना पलसाने यांनी कवी सफरअली इसफ यांच्या 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले. पुणे साने गुरुजी स्मारक येथे प्रा.पलसाने आणि नामवंत कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या 'अल्लाह ईश्वर' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्याला साहित्य नाटक चित्रपट संगीत क्षेत्रातील विविध मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.       दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आल

सिंधुदुर्ग today

इमेज
प्रमोद जठार यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंनी दिल्या शुभेच्छा. कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे रे महाराजा... प्रमोद जठार यांनी घातले साकडे  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक,सिंधुरत्न समृध्दी समिती सदस्य तथा माजी आम.प्रमोद जठार यांचा ५९ वा वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा कासार्डेतील निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, हितचिंतक यानी उपस्थित राहून श्री. जठार याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सीमेवर जे जवान काम करत आहेत.त्यांच्या व आपल्या सर्वाच्या आयुष्यात असेच वाढदिवस यावेत व सुख समृद्धी येवून कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे महाराजा ऐवढीच पार्थना करतो असे त्यानी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळ्यात सांगितले.  यावेळी अभीष्टचिंतन सोहळ्यास केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी- सिंधुदुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्नी सौ. निरजा जठार,

सिंधुदुर्ग today

इमेज
भिरवंडेत वादळी वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान कणकवली: (ऋषिकेश मोरजकर)  भिरवंडे गावामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार वादळीवाऱ्यांचा तडका बसला.अचानक जोरदार वादळ वारे वाहू लागल्याने त्यात आमनीपाचेवाडी येथील पंढरीनाथ सिताराम परब यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे परब यांच्या घराचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस उष्णतेचा पारा वाढलेला असतानाच अचानक गुरुवारी मध्यरात्री वादळी वारे सुरू झाले. त्यातच विद्युत पुरवठा ही खंडित झाला होता. जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे  परब यांच्या घराजवळ असलेले आंब्याचे झाड मोडून घराच्या छपरावर पडले त्यामुळे घराच्या छपराचे नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कुणालाही इजा पोचली नाही.

सिंधुदुर्ग today

इमेज
तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश इस्वलकर वाडीतील रस्ता  निवडणूकीपूर्वी पूर्ण झाल्यानंतर लागलीच असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील तोंडवली इस्वलकर वाडीतील असंख्य ग्रामस्थांचा आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.    इस्वलकर वाडीतील रस्ता निवडणूकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्यानंतर लगेचच सर्व वाडीतील असंख्य ग्रामस्थांनी आज आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.      यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली मंडळ महिला तालुका अध्यक्षा सौ हर्षदा वाळके,मिलिंद मेस्त्री तालुकाध्यक्ष ,खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर,तोंडवली सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, माजी सरपंच उमेश कुडतरकर,संतोष मिराशी बुवा ,गंगाधर बोभाटे, योगेश सदडेकर ,तोंडवली बुथ अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
कनेडी, नांदगाव, तळेरे बाजारात आज पोलीस संचलन लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी संचलन कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  आगामी येणाऱ्या 7 मे 2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जनतेने निर्भयपणे मतदान करावे या उद्देशाने कणकवली पोलिसांनी आज कणकवली तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ असलेल्या कनेडी, नांदगाव ,तळेरे या ठिकाणी पोलीस संचलन केले आहे . यामध्ये आठ पोलीस अधिकारी 80 पोलीस अंमलदार , 50 होमगार्ड यांचा समावेश होता.        यावेळी कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री घनश्याम आडाव , कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे , विजयदुर्ग पोलीस ठाणे एपीआय सोनवलकर, पीएस.आय देठे , पीएस.आय शेगडे ,पीएसआय वैभववाडी पाटील  असे वरीष्ठ पोलिस अधिकारी 8   ,व 80 पोलीस अंमलदार ,15 होमगार्ड आदींचा संचलन मध्ये सहभाग होता.

सिंधुदुर्ग today

इमेज
कवी सफरअली इसफ यांच्या अल्लाह ईश्वर काव्यसंग्रहाचे प्रा.वंदना पलसाने, कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशन २० रोजी पुण्यात प्रकाशन सोहळा अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर, कवयित्री अंजली ढमाळ यांचे कविता वाचन. कणकवली/ऋषिकेश मोरजकर          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कवी सफरअली इसफ यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'अल्लाह ईश्वर'  या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार २० एप्रिल रोजी सायं.६ वा. पुणे साने गुरुजी स्मारक नाथ पै सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ अभ्यासिका प्रा.वंदना पलसाने, कवी अजय कांडर यांच्या हस्ते 'अल्लाह ईश्वर ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.        सदर कार्यक्रम दोन विभागात आयोजित करण्यात आला असून पहिल्या विभागात अभिनेत्री मुक्ता कदम, अभिनेता कृतार्थ शेवगावकर आणि नामवंत कवयित्री अंजली ढमाळ ही कलावंत मंडळी सफरअली इसफ यांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. अल्लाह ईश्वर मधील कविता आजच्या वास्तवाला धरून कोणत्या भावार्थाने लिहिल्या गेल्या आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र ! आमदार नितेश राणेंच्या उपस्थित केला भाजपमध्ये प्रवेश  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे.            आमदार नितेश राणेंच्या उपस्थित सलग सातव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू आहे.         यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोट्या सावंत, संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, माजी सरपंच सुशिल इंदप , शैलेश इंदप, आनंद शेलार, चंद्रकांत इंदप, सुचिता पोकळे, मंगेश इंदप, पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,छोटू खोत , आयनल माजी सरपंच बापू फाटक, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव हायवे मोजणी स्थळी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त.  सर्व लगत असलेल्या जमीन मालकांना नोटीसा न बजावल्याने होता विरोध. मोजणी अंतिम टप्प्यात; हद्द निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या हद्द निश्चितीसाठी आज मोजणी हाती घेण्यात आली होती. यावेळी जुन्या मोजणी प्रमाणे मोजणी करा व सर्व लगत असलेल्या गट क्रमांकांची मोजणी करण्यात यावी अशी मागणी लगत असलेल्या जमीन मालकांनी केली .      यावेळी नांदगाव येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.    महामार्ग पूर्ण झाला पण महामार्गाची हद्द किती पर्यंत व शेतकऱ्यांच्या जमिनी कुठपर्यंत गेल्या व आता हायवे हद्द कुठपर्यंत असणार आहे. याबाबत हद्द निश्चित करण्यासाठी अखेर आज शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी मोजणी साठी हायवे प्राधिकरण, भुमी अभिलेख,केसीसी कंपनी आली मात्र लगत असलेल्या जमिन मालकांना सदर नोटीशीमध्ये गट क्रमांक उल्लेख नसल्याने जमीन मालकांनी विरोध केला. व मोजणी करायची तर अर्धवट गट न करता संपूर्ण मोजणी करावी तसेच जुनी मोजणी करून हायवे हद्

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे रमजान ईद उत्साहात साजरी छोट्या रोजेदार यांचे स्वागत कणकवली (ऋषिकेश मोरजकर) नांदगाव येथे मोठ्या उत्साहात ईद उल फितर रमजान ईद साजरी करण्यात आली या वेळी दोन्ही गौसिया मस्जिद येथे ईद मुबारकची  नमाज पठण करण्यात आली मुस्लिम बांधवांनी ईद मुबारक च्या एक मेकांना गळा भेट करुन शुभेच्छा दिल्या आहेत .    यावेळी दरवर्षी प्रमाणे लहान छोटे रोजदार यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या छोटे रोजदार मध्ये आयत बटवाले, निखत बटवाले, हसन बटवाले, राहत बटवाले, फरहिन बटवाले, खालिद बटवाले, इफरा बटवाले , सोयेब बटवाले , निखत हवालदार, अल्फिया बटवाले, आलिझा बटवाले ,आयेशा नावलेकर, आफिया हवालदार, जोया बटवाले ,सैफ बटवाले, सुफियान बटवाले ,उबेद साटविलकर या छोटे रोजदार यांचे पुष्पगुच्छ हारतुरे व भेट वस्तू अहमद बटवाले ,रज्जाक बटवाले ,पत्रकार उत्तम सावंत, सइद बटवाले, यासिन बटवाले, शाहिद बटवाले ,रज्जाक हवालदार, इमाम नावलेकर, समिर बटवाले आदी मान्यवर उपस्थित होते.   या छोटे रोजदार यांना त्यांच्या आई वडील व मित्र मंडळ यांनी एक महिना सहकार्य केले आहे. या रमजान ईद निमित्त नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी भ

सिंधुदुर्ग today

इमेज
  कवी अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच" दीर्घ कवितेचा अनुवाद आता हिंदी एम. ए.च्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी विभागातर्फे सन्मान ख्यातनाम अनुवादक डॉ.सुधाकर शेंडगे यांनी केलेला अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनाकडून प्रसिद्ध कणकवली / ऋषिकेश मोरजकर             लोकवाड:मय गृह मुंबई प्रकाशित सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच' या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दीर्घ कवितेच्या एका वर्षात तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. दूरदर्शनने त्यावर नाट्य निर्नितीही केली.आता सदर दीर्घ कवितेचा हिंदी अनुवाद बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.     'युगानुयुगे तूच' दीर्घ कविता प्रकाशित झाल्या नंतर तिला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.त्यावर मराठी साहित्यातील मान्यवर समीक्षकांनी दीर्घ लेखन केले असून समीक्षक प्रा.एकनाथ पाटील यांनी त्यावरील संपादित केलेला समीक्षा ग्रंथही लोकवाड:मय गृहने प्रसिद्ध केला आहे. आता या कवितेचा हिंदी अनुवाद संभाजीनगर (औरंगाबाद) येथील ख्यातनाम अन

सिंधुदुर्ग today

इमेज
अखेर नांदगाव येथील हायवे हद्द निश्चित करण्यासाठी १२ एप्रिल रोजी होणार मोजणी. २४० लगत असलेल्या शेतकऱ्यांना बजावल्या नोटीसा. नांदगाव तिठा ब्रिज व ओटवफाटा ब्रिज लगत असलेल्या जागेची होणार हद्द निश्चित   नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपद्रीकरण करण्यासाठी लगत असलेल्या शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करुन सदर महामार्गाचे कामही अंतिम टप्प्यात होत आहे.  अशातच नांदगाव  ग्रामसभा तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता पूर्ण झाला पण महामार्गाची हद्द किती पर्यंत व शेतकऱ्यांच्या जमिनी कुठपर्यंत गेल्या व आता हायवे हद्द कुठपर्यंत असणार आहे. याबाबत हद्द निश्चित करण्यासाठी अखेर येणाऱ्या शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजी मोजणी होणार आहे. दरम्यान याबाबत लगत असलेल्या २४० शेतकऱ्यांना हजर राहण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.  नांदगाव तिठा ब्रिज व ओटवफाटा ब्रिज लगत असलेल्या जागेची हद्द निश्चित अगोदर केली जाणार असून उर्वरित पुढील टप्प्यात होणार आहे .       मागील महिन्यातच काही शेतकऱ्यांना नोटीसा बजावून मोजणी केली जाणार होती.मात्र त्यावेळी नांदगाव सरपंच

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथील स्वामींच्या मठात १० एप्रिल रोजी प्रकट दिन सोहळा. नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव  विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा 10 एप्रिल 2024 रोजी साजरा होणार आहे . यानिमित्त कार्यक्रम सकाळी ८.३० ते ९ स्वामींचा अभिषेक, सकाळी ९ .३० ते १२.०० वा. स्वामी मंत्र जप, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ६ आरती अशा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसाद चा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मठातर्फे करण्यात आलेले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  जिल्ह्यात  18 एप्रिलपर्यंत मनाई आदेश सिंधुदुर्गनगरी, दि. (ऋषिकेश मोरजकर )  जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी 24.00 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला असल्याचे जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.  जिल्ह्यात दिनांक 12.3.24 रोजीपासुन रमजान मास प्रारंभ, दिनांक 9.4.2024 रोजी गुढीपाडवा, दिनांक 11.4.24 रोजी रमजान ईद, दिनांक 14.4.24 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक 17.4.24 रोजी रामनवमी असे सण उत्सव साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यापूर्वी राज्यात उत्सवाचे कालावधीत जातीय घटना घडलेल्या असुन त्याचे पडसाद राज्यात उमटून विविध राजकिय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटुन जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सद्या

सिंधुदुर्ग today

इमेज
ओसरगांव नं १ प्राथ. शाळेतील विद्यार्थी . गंधार चौकेकर आणि चैत्राली चौकेकर यांचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश. कणकवली/प्रतिनिधी         जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नं.१च्या गंधार प्रदीप चौकेकर आणि चैत्राली मनोज चौकेकर या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.सदर परीक्षेमध्ये इयत्ता सहावीसाठी या दोन विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.    सदर यशस्वी विद्यार्थ्यांना या शाळेच्या सहशिक्षिका प्रमिता सुनील तांबे यांनी मार्गदर्शन केले असून त्यांना शाळेचे  मुख्याध्यापक किशोर कदम,सहकारी शिक्षक शितल दळवी, राजश्री तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  जिवबा अपराध यांचे त्यांना सहकार्य लाभले.या यशाबद्दल केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक कणकवली उपतालुकाप्रमुख पदी उत्तम तांबे  खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत दिले नियुक्ती पत्र  नांदगाव प्रतिनिधी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक कणकवली उपतालुकाप्रमुख पदी उत्तम रामचंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी अरुणभाई दुधवडकर,आमदार वैभव नाईक, सतीश सावंत ,संदेश पारकर, सुशांत नाईक ,अनंत पिळणकर ,पालव मॅडम,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,गुडेकर मॅडम ,कन्हैया पारकर ,हरमलकर संदीप कदम ,राठोड, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,राजा नावळेकर ,तात्या निकम, आबु मेस्त्री ,अफजल बटवाले ,सादिक, असिफ ,आदी मान्यवर उपस्थित होते.