सिंधुदुर्ग today


देवगड - निपाणी महामार्गावर तोंडवली येथे दोन वाहनांच्या धडकेत एक जखमी; वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान 

नांदगाव  : प्रतिनिधी 

     देवगड निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथील हनुमान मंदीर नजीकच्या धोकादायक वळणावर चार चाकी व मालवाहू टेम्पो याच्यात  अपघात होत एक बाळ आणि एक स्त्री आणि एक पुरुष असे मिळून तिघांना दुखापत झाली.तर दोन्ही गाड्यांच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सदर अपघात आज ( २४ एप्रिल ) रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घडला. दरम्यान जखमींना कवी - पत्रकार अजय कांडर यांनी नांदगाव येथील खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले.

    नांदगाव वरून फोंडाघाटच्या दिशेने जाणारी चारचाकी कार व फोंडाघाट वरून नांदगावच्या दिशेने जाणारा मालवाहू टेम्पो तोंडवली बोभाटेवाडी येथील धोकादायक वळणावर आले असता वाहनाचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे समजते.मात्र नेमका अपघात कसा घडला याची माहीती मिळु शकली नाही. अपघातानतंर काहीकाळ वाहतूक ठप्प होती. मात्र स्थानिकांनी मदतकार्य करीत वाहतूक पूर्ववत केली. उशिरापर्यंत या अपघाताची पोलिसात नोंद नव्हती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today