सिंधुदुर्ग today



असलदे सरपंच चंद्रकांत डामरे व उपसरपंच सचिन परब यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र !

भाजपा नेते विनोद तावडे व आमदार नितेश राणेंच्या उपस्थित केला भाजपमध्ये प्रवेश. 

नांदगाव पंचायत समिती विभागातील उबाठा सेनेला दुसरा धक्का.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील असलदे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच चंद्रकांत डामरे यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नांदगाव पंचायत समिती विभागातील उबाठा सेनेला दुसरा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी ही उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपचे नेते विनोद तावडे व आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता कोळोशी लगत असलेल्या असलदे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी ही आज भाजपाचे कमळ हाती घेतल्याने ठाकरे सेनेला दुसरा धक्का बसला आहे.

       शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असलदे सरपंच श्री.चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब,विभागीय शाखा संघटक मनोज लोके,विजय खरात, सचिन हरमलकर,प्रवीण डगरे,हर्षद परब, विजय वरक यांच्यासह असलदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. असलदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी  आमदार नितेशजी राणेंच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले.तसेच या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायणराव राणे  यांच्या विजयात खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्हाला निर्णय घ्यावा लागला.असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,व्हा.चेअरमन दयानंद हडकर,रघुनाथ लोके,प्रशांत परब,कृष्णा वायंगणकर,संतोष परब,किरण परब,संदीप नरे,महेश लोके,उदय परब,दिनेश तावडे ,उपसरपंच इरफान साठविलकर, गवस साठविलकर,यासीर मास्के आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today