सिंधुदुर्ग today



ओटव फाट्यावरील पथदिवे अर्धे चालू तर अर्धे बंद स्थितीत.

गेल्या 15 दिवसांपासून सुचना करुन ही कंपनी कडून दखल नाही.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथदिवे अर्धे चालू तर अर्धे बंद स्थितीत आहेत. याबाबत वारंवार सुचनाही केली असून ही दुर्लक्ष होत आहे.        

         नांदगाव ओटव फाटा ब्रिज वरील पथ दिवे लावून जवळपास वर्ष दोन वर्ष लोटली परंतु ट्रांसफार्मर उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. यानंतर सरपंच भाई मोरजकर यांनी मध्यस्थी करून जवळच असलेल्या अमोल गावकर यांना याबाबत जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली असता त्यांनी संमती देवून जवळपास गेल्या श्री गणेश चतुर्थी पासून काम सुरू होते.नंतर ते दिपावली ला सदर पथदिवे सुरू करण्यात आले. मात्र काही दिवसांतच काही  पंथ दिवे बंद स्थितीत आहेत.याबाबत संबंधित यंत्रणेला सांगूनही अद्यापही संबंधित केसीसी कंपनीने याबाबत दुर्लक्ष केले आहे.नांदगाव च्या नागरीकांना प्रत्येक हायवे च्या प्रलंबित कामांना आंदोलनच करायची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल सर्व सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today