सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील स्वामींच्या मठात १० एप्रिल रोजी प्रकट दिन सोहळा.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा मठ नांदगाव मधली वाडी येथे श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा 10 एप्रिल 2024 रोजी साजरा होणार आहे . यानिमित्त कार्यक्रम सकाळी ८.३० ते ९ स्वामींचा अभिषेक, सकाळी ९ .३० ते १२.०० वा. स्वामी मंत्र जप, दुपारी १२ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ६ आरती अशा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसाद चा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मठातर्फे करण्यात आलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा