सिंधुदुर्ग today
नांदगाव मधली वाडी येथील महापुरुषांच्या चरणी झाला नतमस्तक
सहा महिन्यापूर्वी एक स्क्रॅप
विक्रेता जुने स्क्रॅप घेऊन ही पैसे न देता केले होते पलायन
आता स्क्रॅप ची झालेली रक्कम महापुरुष चरणी केली अर्पण
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
श्री महापुरुष प्रसन्न असं म्हटलं की आपण आपल्या वाडीतील देवा जवळ आहोत असे वाटते आज अशी सत्य घटना घडली की तुमचाच काय सर्वांना यांचा आनंद वाटेल सहा महिन्यापूर्वी एक स्क्रॅप विक्रेता नांदगाव मधली वाडी महापुरुष हॉलचे काम चालू असताना वाडीतील प्रमुख युवकांनी त्याला खराब झालेलं लोखंड ३८०० रु दिले व तो स्क्रॅप वाला ओळखीचा होता म्हणून एक तासाने आणून देतो असे सांगून गेला. तो गेला तो आलाच नाही .सगळीकडे शोधून चौकशी करून त्यांचा पत्ता लागत नव्हता आणि आज सकाळी अचानक 10 वाजता तो आपल्या कुटुंबासहित महापुरुषाच्या पारा जवळ हजर झाला त्याचे आई-वडील व तो मुलगा हात जोडत विनवणी करत आमचं चुकलं हे तुमचे पैसे घ्या आणि झालेल्या चुकीची आम्ही क्षमा मागतो . महापुरुषाच्या जवळ येऊन त्यांनी पाच फळ, केळी, चार हजार रुपये ,नारळ, अगरबत्ती ठेवून झालेल्या चुकीची नाक घासून क्षमा मागितली तसेच इथून जे सामान घेऊन गेले होते तेव्हापासून त्यांचा धंदा होत नव्हता त्याच्या कुटुंबात आजारपण सुरू झाले होते शेवटी त्याला त्याची चूक समजली म्हणून तो आज सकाळी येऊन त्याने या देवाची माफी मागितली आणि असं कधी करणार नाही फसवणार नाही असं सांगून तो गेला.म्हणुनच मधली वाडी महापुरुष देव हा नवसाला पावनारा हाकेला धावनारा असे हे महापुरुष देवस्थान आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा