सिंधुदुर्ग today
केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या कासार्डे जि.प.गटातील असलदेत होणार प्रचार सभा.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणेंची उपस्थित राहणार
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
केंद्रीय मंत्री नारायणराव राणेंच्या प्रचारार्थ उद्या बुधवार दिनांक 1 मे रोजी सकाळी ठीक 10.30 वा. महायुतीची कासार्डे जिल्हा परिषद गटातील प्रचार सभा गौरी मंगल कार्यालय असलदे येथे आयोजित करण्यात आली आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, आमदार नितेश राणे,व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.कासार्डे जिल्हा परिषद गटात नारायणराव राणेंच्या प्रचार सभेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.
तरी कासार्डे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मिलिंद मेस्त्री,हर्षदा वाळके, संजय देसाई, पंढरी वायंगणकर, भाई मोरजकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा