सिंधुदुर्ग today
लोरे नं.२ येथील उबाठा गटाचे ग्रा.पं. सदस्य विजय मांडवकर यांच्यासह युवासेना अमोल गोरुले यांनी केला भाजपात प्रवेश.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील लोरे नं२ येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते विजय मांडवकर व अमोल गोरुले यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून लोरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.
यावेळी दिलीप राव राणे, बंटी राव राणे आदि भाजप उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा