सिंधुदुर्ग today



फोंडाघाट विभागातील येथील उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील फोंडा विभागातील येथील उभाठा गटाचे कार्यकर्ते दीपक लाड, अशोक लाड, सत्यवान रावराणे, ओमकार लाड, सुधीर लाड, सदानंद लाड, भगवान गोसावी, प्रतीक लाड, विनायक गोसावी, प्रणय लाड, यश लाड, दत्तगुरु गुरव, भाऊ लाड, यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणते विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्याकडे पाहून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून फोंडा गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा प्रवेश केला असे प्रवेश करताना सांगितले.

यावेळी मनोज राव राणे, राजन चिके, मामा हळदीवे, संजय आग्रे, संतोष कानडे, सुरेश सामंत, सुजाता हळदिवे, संजना आग्रे आदि भाजप उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today