सिंधुदुर्ग today



नांदगाव हायवे मोजणी स्थळी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त. 

सर्व लगत असलेल्या जमीन मालकांना नोटीसा न बजावल्याने होता विरोध.

मोजणी अंतिम टप्प्यात; हद्द निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या हद्द निश्चितीसाठी आज मोजणी हाती घेण्यात आली होती. यावेळी जुन्या मोजणी प्रमाणे मोजणी करा व सर्व लगत असलेल्या गट क्रमांकांची मोजणी करण्यात यावी अशी मागणी लगत असलेल्या जमीन मालकांनी केली .

     यावेळी नांदगाव येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

   महामार्ग पूर्ण झाला पण महामार्गाची हद्द किती पर्यंत व शेतकऱ्यांच्या जमिनी कुठपर्यंत गेल्या व आता हायवे हद्द कुठपर्यंत असणार आहे. याबाबत हद्द निश्चित करण्यासाठी अखेर आज शुक्रवार दिनांक १२ एप्रिल रोजी मोजणी साठी हायवे प्राधिकरण, भुमी अभिलेख,केसीसी कंपनी आली मात्र लगत असलेल्या जमिन मालकांना सदर नोटीशीमध्ये गट क्रमांक उल्लेख नसल्याने जमीन मालकांनी विरोध केला. व मोजणी करायची तर अर्धवट गट न करता संपूर्ण मोजणी करावी तसेच जुनी मोजणी करून हायवे हद्दी निस होते. त्या पुढे आल्यास आमचा विरोध आहे.अशी भुमिका मांडली. आता प्रत्यक्ष मोजणी अंतिम टप्प्यात आली असून हद्द निश्चितीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.

     यावेळी नांदगाव येथे मोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्याचा चोख बंदोबस्त ठेवला होता.यामुळे नांदगाव तिठा परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यामध्ये पोलीस सहाय्यक निरीक्षक मनोज पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल हाडळ, शरद देठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत झोरे, महीला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता माने, महिला पोलिस कॉन्स्टेबल सुप्रिया भागवत आदी कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर नांदगाव प्रभारी पोलीस पाटील पांडू मयेकर, हायवे प्राधिकरण अभियंता अतुल शिवनिवार, कुमावत,भुमिअभिलेख व केसीसी कंपनी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today