सिंधुदुर्ग today
कनेडी, नांदगाव, तळेरे बाजारात आज पोलीस संचलन
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्यासाठी संचलन
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
आगामी येणाऱ्या 7 मे 2024 च्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जनतेने निर्भयपणे मतदान करावे या उद्देशाने कणकवली पोलिसांनी आज कणकवली तालुक्यातील महत्त्वाच्या बाजारपेठ असलेल्या कनेडी, नांदगाव ,तळेरे या ठिकाणी पोलीस संचलन केले आहे . यामध्ये आठ पोलीस अधिकारी 80 पोलीस अंमलदार , 50 होमगार्ड यांचा समावेश होता.
यावेळी कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री घनश्याम आडाव , कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे , विजयदुर्ग पोलीस ठाणे एपीआय सोनवलकर, पीएस.आय देठे , पीएस.आय
शेगडे ,पीएसआय वैभववाडी पाटील असे वरीष्ठ पोलिस अधिकारी 8 ,व 80 पोलीस अंमलदार ,15 होमगार्ड आदींचा संचलन मध्ये सहभाग होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा