सिंधुदुर्ग today
कवयित्री योगिता शेटकर यांचे पणजी आकाशवाणीवर १ मे रोजी कविता वाचन
कणकवली/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पकालावधीत नावलौकिक मिळवलेल्या कवयित्री योगिता शेटकर यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम १ मे रोजी सायं. ५.३० वा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादाई केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
कवयित्री योगिता शेटकर यांचे यापूर्वी आकाशवाणीवर कविता वाचन प्रसारित झाले आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र, दिवाळी अंकात त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा 'करुणेचा प्रवाह' काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून यातील कवितेला कवितेच्या जाणकारांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. कवितेसाठी त्यांना राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत. तरी सदर कविता वाचनाचा आस्वाद साहित्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा