सिंधुदुर्ग today



ओसरगांव नं १ प्राथ. शाळेतील विद्यार्थी.

गंधार चौकेकर आणि चैत्राली चौकेकर यांचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश.

कणकवली/प्रतिनिधी

        जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगाव नं.१च्या गंधार प्रदीप चौकेकर आणि चैत्राली मनोज चौकेकर या विद्यार्थ्यांनी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले.सदर परीक्षेमध्ये इयत्ता सहावीसाठी या दोन विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीत निवड झाली असल्याने दोन्ही विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

   सदर यशस्वी विद्यार्थ्यांना या शाळेच्या सहशिक्षिका प्रमिता सुनील तांबे यांनी मार्गदर्शन केले असून त्यांना शाळेचे  मुख्याध्यापक किशोर कदम,सहकारी शिक्षक शितल दळवी, राजश्री तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  जिवबा अपराध यांचे त्यांना सहकार्य लाभले.या यशाबद्दल केंद्रप्रमुख सुरेश हरकुळकर, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today