सिंधुदुर्ग today
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी मुस्लिम समाज प्रचारात सक्रिय
हुमरठ,साकेडी येथील मुस्लिम समाज पुढे सरसावला
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचा बैठकांचा धडाका सुरू
कणकवली; प्रतिनिधी
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील गाव हुमरठ व साकेडी येथे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे प्रचारार्थ बैठका घेतल्या. यावेळी उमेदवार नारायण राणे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा शब्द दिला. यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर,कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा प्रतिनिधी गणेश चौगुले, जिल्हा प्रतिनिधी केदार खोत, हुमरठ माजी उपसरपंच मुश्ताक काझी, सईद काझी, वासिम शेमना व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर साकेडी येथे सुद्धा मुस्लिम समाज बांधवांनी नारायण राणे यांना विजयी करण्याचा निर्धार केला यावेळी उपसरपंच जहुर शेख, अकबर शेख, अझहर शेख, दिलदार शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा