सिंधुदुर्ग today
कणकवली तालुक्याचे १६,००० बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट पूर्ण.
अजून २००० हजार बंधारे बांधण्याचा संकल्प.
नांदगाव येथील नदी काठीच्या बंधार्याची केली जिल्हाधिकारी यांनी पाहणी.
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील एकूण १६,००० हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट होते. ते उद्दिष्ट पूर्ण झाले असून अजून कणकवली तालुक्यात २००० हजार बंधारे बांधण्याचा संकल्प केला असल्याचे सभापती सौ हर्षदा वाळके यांनी बोलताना सांगितले आहे.
नांदगाव येथील आरोग्य संवाद यात्रा अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अपूर्वा बासूर यांनी नांदगाव पावाची वाडी नदी काठी नांदगाव ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली.
यावेळी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, पंचायत समिती सदस्य सौ. महेश्वरी चव्हाण,ग्रामपंचायत सदस्या अक्षता खोत, गौरी परब, रमिजान बटवाले आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा