सिंधुदुर्ग today
हेवाळे-बाबरवाडी येथील जेष्ठ नागरिक आपा कुंभार यांचे निधन.
कवी मोहन कुंभार यांना पितृशोक.
दोडमार्ग /प्रतिनिधी
हेवाळे बाबरवाडी येथील जेष्ठ नागरिक न्हानु व्यंकटेश कुंभार (वय ८५) यांचे राहत्या घरी निधन झाले. बाबरवाडी येथे आपा कुंभार म्हणून ते परिचित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी आणि ललित लेखक, प्रा.मोहन कुंभार, पोईप विरण प्रशाळेचे मुख्याध्यापक विकास कुंभार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर कुंभार यांचे ते वडील होत.
त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी हेवाळे बाबरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे, मुलगी, भाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा