सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत सी.ई.ओ.अपूर्वा बासूर यांनी घेतला आढावा. 

पालकमंत्री नितेश राणेंच्या आढावा बैठकी नंतर पहिल्यांदाच नांदगावात पाहणी.

नांदगाव : (ऋषिकेश मोरजकर)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जल जीवन मिशन च्या कामाबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी नांदगाव मध्ये भेट देऊन जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. नांदगाव गावामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत आठ योजना प्रस्तावित आहेत या आठ योजनांपैकी सहा योजनांचे काम जवळपास 80 ते 90 टक्के पूर्ण झालेल आहे आणि असे असूनही एकाद दुसरी योजना वगळता चार योजना अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाहीत.त्याचबरोबर दोन योजनांचे काम बाकी आहे आणि याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच श्री रविराज  मोरजकर यांच्याशी चर्चा केली आणि वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.कागदोपत्री जरी जलजीवन मिशन योजनेचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाल्याच आपल्याला दिसत असलं तरी प्रत्यक्षात जागेवर जाऊन वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ठिकठिकाणी भेट देण्याचे ठरविलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रथमच नांदगाव येथे भेट देऊन जल जीवन मिशन योजनेतील कामाचा आढावा घेतला.

     यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता श्री राणे , सरपंच श्री.रविराज मोरजकर, उपसरपंच श्री.इरफान साठविलकर , श्री गुरसाळे,श्री घेवडे, श्री अमित सावंत , तसेच ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र सावंत,राजू खोत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today