सिंधुदुर्ग today
राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने शिक्षिका मंजुषा चित्रवेकर सन्मानित
शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल गौरव
डोंबिवली: प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग, विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध शैक्षणिक योजना आणि उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षिका मंजुषा चित्रवेकर यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार 2026'ने गौरविण्यात आले.
कोकण विभाग पत्रकार संघ, ठाणे टाइम्स आणि श्वास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, साप्ताहिक 'बातम्यांचे दोनच रंग - ब्लॅक अँड व्हाईट' आयोजित या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.डोंबिवली पूर्व येथील वक्रतुंड सभागृह, गणेश मंदिर संस्थान येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून कल्याण खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे उपस्थित होते.आमदार किसन कथोरे, आमदार राजेश गोवर्धन मोरे, आमदार निरंजन वसंत डावखरे, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली विजय चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंजुषा चित्रवेकर यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी हिताच्या विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या या समर्पित आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन निवड समितीने त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.या पुरस्कारामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना नक्कीच प्रेरणा मिळणार असून, सर्व स्तरातून मंजुषा यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा