सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथे बसविण्यात आले सीसीटीव्ही कॅमेरे

पं.स.सभापती सौ.हर्षदा वाळके ,जि.प. सदस्य संतोष पारकर यांच्या हस्ते उद्घाटन

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
ग्राम पंचायत नांदगाव च्या 15 वा वित्त आयोगामधून प्राथमिक शाळा,तसेच नांदगाव तिठा येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे गावामध्ये होणाऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या तसेच गुन्हेगारीला आळा बसेल,तसेच यामुळे चोरांना,गुन्हेगारांना एक प्रकारचा धाक बसेल असे मत सरपंच श्री.रविराज मोरजकर यांनी व्यक्त केल.नांदगाव तिठा येथे हायवे प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण सुरू आहे आणि संपूर्ण पूल रंगविण्याचे काम सुरू आहे.ग्राम पंचायत नांदगावच्या सरपंच, उप सरपंच,ग्राम पंचायत सदस्य यांच्या पाठपुराव्यातून तसेच पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.त्याठिकाणी सुद्धा भेट देण्यात आली


 
         यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती
सौ.हर्षदा वाळके , जि.प.सदस्य संतोष पारकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उप सरपंच इरफान साटविलकर,ग्राम पंचायत सदस्य पूजा सावंत , रमीजान बटवाले , जैबा नावळेकर, नमिता मोरये ,अक्षता खोत, गौरी परब , ग्राम पंचायत अधिकारी राजेंद्र सावंत तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु तांबे, मारुती मोरये , विलास कांडर, इकबाल बटवाले, शकील बटवाले, रज्जाक बटवाले, अलाउद्दीन बोबडे, तुकाराम मोरये संदेश मोरये एकनाथ मोरये, जाफर कुणकेरकर आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today