सिंधुदुर्ग today

 


नांदगाव गावामध्ये वनराई बंधारे बांधण्याचा श्रीगणेशा.

पालकमंत्री नितेश राणे यांनी केले होते आवाहन.

नांदगावात एकूण ३५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट. 

नांदगाव/(ऋषिकेश मोरजकर)

सध्या दुष्काळी परिस्थितीशी लढा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात पाणी अडवा पाणी जिरवा बंधारे बांधले जात आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी ही सर्वांना आवाहन केले आहे. याच अनुषंगाने नांदगाव गाव पाहता ३५ बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या अनुषंगाने 

आज नांदगाव पाठवणेवाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्यातून तीन ठिकाणी बंधारे बांधण्यात आल्याने नांदगाव येथे बंधारे बांधण्याचा श्रीगणेशा झाला आहे. 

        दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी समस्त सिंधुदुर्ग जिल्हावासियाना आवाहन केल होते आणि त्या अनुषंगाने आज नांदगाव सरपंच श्री रविराज मोरजकर यांनी पुढाकार घेत नांदगाव पाठवणे वाडी येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधण्याचा प्रारंभ केला आहे.

    कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांनी ही या बंधारा बांधला त्या ठिकाणी भेट दिली.

    नांदगाव पाठवणेवाडीतील ग्रामस्थ सुदेश तोरसकर ,विजय कदम ,संजय धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी परब , गणेश खोत, मंगेश परब, कृषी सेवक श्री गजानन पवार ,ग्राम पंचायत कर्मचारी सर्फराज बटवाले,यांनी बहुमोल सहकार्य केले‌.

       नांदगाव गावात अजून जागोजागी बंधारे बांधले जाणार आहेत. आगामी दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी सर्व नांदगाव गावातील जनतेने सहकार्य करावे आणि पाणी अडवा पाणी जिरवा बंधारे बांधण्याच्या कामी सहकार्य करावे असे आवाहन नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today