सिंधुदुर्ग today
नांदगाव वाघाची वाडी येथील १०१ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक शांताराम लाडोजी मेस्त्री यांचे निधन.
नांदगाव /प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडीतील शांताराम लाडोजी मेस्त्री यांचे नुकतेच वृद्धापकाळाने नांदगाव वाघाची वाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ते कुटुंबातील आधारस्तंभ प्रमाणे होते. त्यांच्या कुटुंबीयांनी ही त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली होती. गेल्या वर्षी त्यांचा १०० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
त्यांच्या पश्चात ८ विवाहित मुलगे ,१ विवाहित मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा