पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंधुदुर्ग today

इमेज
भाजपा अनु .जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी संतोष जाधव यांची निवड कणकवली प्रतिनिधी        संतोष जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.यांच्या निवडीने अभिनंदन केले जात आहे.        संतोष जाधव हे मुळ दिगवळे  रांजणवाडी येथील ,परंतू गेली २४ वर्षे ते नांदगाव येथे घर बांधून स्थायिक झाले आहेत . ते केंद्रप्रमुख म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावून सेवानिवृत्त आहेत . जाधव सर हे सेवेत असताना शिक्षक संघटनेत ही त्यांनी जिल्हास्तरावरील महत्वाची पदे भुषविली आहेत .सध्या ते महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ या राज्यस्तरीय संघटनेत राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत .त्यामुळे त्यांचा लोक संग्रह चांगला आहे .शिवाय ते भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेत सध्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत .सेवाकाळात त्यांना आविष्कार फांऊंडेशन या  संघटनेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून पुरस्कारही प्राप्त आहे . संपूर्ण जिल्हयात जि .प . चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांचे ते विश्वासू निकटवर्तीय म्हणूनही परिचित असून युवा संद

सिंधुदुर्ग today

इमेज
  राजकीय सामाजिक प्रदूषणात संघटित होणे हाच उपाय 'हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून' ग्रंथाच्या चर्चासत्रात अभ्यासकांचे मत अंकुश कदम लिखित ग्रंथावरील चर्चासत्रात हुमायून मुरसल,अजय कांडर,नारायण खराडे यांचा सहभाग सावंतवाडी/प्रतिनिधी          एखादा सामाजिक कार्यकर्ता समाज स्तरावर जाऊन काम करतो आणि ते अनुभव शब्दातून मांडतो तरी मात्र मूळ समस्या सुटत नाही. या प्रत्येक गोष्टी मागे राजकारणच कारणीभूत असतं. त्यामुळे सामाजिक राजकीय प्रदूषणात निखळ माणूस म्हणून जगू पाहणाऱ्या सगळ्यांनी एकत्र येऊन लढा उभारणे हाच यामागील उपाय आहे असे मत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या अंकुश कदम लिखित 'हस्तक्षेपाच्या कणखर भूमितून ' या ग्रंथावरील चर्चासत्रात विविध अभ्यासकांनी व्यक्त केले.         सत्यशोधक समता प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या सदर चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत - सामाजिक कार्यकर्ते हुमायून मुरसल ( कोल्हापूर) कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर (कणकवली), नाटककार नारायण खराडे (गोवा) आदी सहभागी झाले होते. समता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते योगेश सपकाळ यांच्या अध्यक्

सिंधुदुर्ग today

इमेज
श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त उद्या विविध कार्यक्रम  कणकवली (ऋषिकेश मोरजकर)  श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी नवरात्रोत्सव आणि मित्र श्री सत्यनारायणाची महापूजा उद्या रविवार दिनांक १३ ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.     यानिमित्त कार्यक्रम पुढील प्रमाणे सकाळी ठीक दहा वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता आरती, दुपारी १ ते ३ तीर्थप्रसाद महाप्रसाद , सायंकाळी ४ ते ५ फुगडी, सायंकाळी ५ ते ६ मुलींचे दिंडी भजन, रात्री ७ ते ९ पर्यंत सुस्वर भजने , रात्री १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन सिध्दीविनायक मित्र मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. देवगड निपाणी हा राज्यमार्ग निधीसाठी पालकमंत्र्यांकडे मी हट्ट धरला - आमदार नितेश राणे  देवगड ते फोंडाघाट पर्यंत ६६ किलोमीटर अंतरावरील होणार काम  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) आ.श्री नितेश  राणे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने देवगड निपाणी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आज  कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते नांदगाव तिठा ब्रिज खाली शुभारंभ करण्यात आला आहे .       देवगड निपाणी हा राज्य महामार्ग देवगड ते फोंडा घाट पर्यंत दुपदरी तसेच काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजुर महामार्ग दर्जेदार बनावा  यासाठी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. आणि मी हट्ट धरल्यानंतर पालकमंत्र्यांनी माझा हट्ट पूर्ण केला असे मत आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे व्यक्त केले आहे. तसेच हा रस्ता करताना ठेकेदाराने चांगल्या दर्जाचा रस्ता करावा काही अडचण असल्यास आम्हाला सांगावे तसेच कुठल्याही प्रकारे

सिंधुदुर्ग today

इमेज
कासार्डे आनंदनगर येथील विश्वास चव्हाण बेपत्ता  कणकवली प्रतिनिधी  कासार्डे आनंदनगर येथील विश्वास रघुनाथ चव्हाण वय ५७ हे मोल मजुरीचे काम मिळते का ? बघून येतो असे सांगून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र ते सायंकाळी उशिरापर्यंत  घरी परत आले नाही तसेच त्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नाही त्यामुळे खबर त्यांचा भाऊ विष्णू रघुनाथ चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे विश्वास चव्हाण यांनी अंगात लाल रंगाच्या रेघांचे चौकटी फुल शर्ट, फुल पॅन्ट, उंची पाच फूट दोन इंच, रंग सावळा, बांधा मध्यम ,चेहरा उभट अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केले आहे .

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव ग्रामपंचायत वतीने कृषी अभ्यास दौरा संपन्न. कृषी निगडित गावांना दिल्या भेटी. नांदगाव प्रतिनिधी         ग्रामपंचायत नांदगाव च्या वतीने कृषी अभ्यास दौरा काढण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे नियोजन 15 वित्त आयोगातून करण्यात आले होते या दौऱ्याच्या नियोजनानुसार कृषी विज्ञान केंद्र मुळदे येथे भेट देण्यात आली  तिथे विविध प्रकारची झाडे तसेच शोभिवंत मत्स्यपालन आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन विषयी माहिती घेण्यात आली.             मुळदे कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक श्री नाईक सर यांनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती दिली मसाल्याच्या पदार्थातील जायफळ सुद्धा आपल्याकडे कोकणात चांगल्या प्रकारे होऊ शकते याची त्यांनी माहिती दिली आणि जायफळ या फळाचे जायफळ व्यतिरिक्त जायफळाला चिकटून असलेला आवरण जायपत्री म्हणून मसाल्याचे पदार्थात वापरता येतं त्याचबरोबर त्याच्या बाहेरील आवरण त्याचं लोणचं पण करता येतं अशा प्रकारे या झाडाचे पूर्ण फळ वापरात येतं अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर मत्स्यपालनाविषयी प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनीही चांगल्या प्रकारे माहिती दिली. निळेली पशु पैदास केंद्र येथे भेट देण्या

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे आज स्थानिक कलाकारांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा  नवरात्र उत्सव समितीच्या वतीने आयोजन  नांदगाव प्रतिनिधी  नांदगाव वरची वाडी येथील श्री देव रवळनाथ, श्री पूर्वाई देवी, श्री दिर्बाई देवी ,मुळ आकार - श्री गणेश गणेश मंदिर नवरात्र उत्सव समिती च्या वतीने नवरात्र उत्सव निमित्ताने  आज  गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी रात्रौ ठीक 9.30 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही तेथील स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचा उद्या आम.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ. देवगड ते फोंडाघाट पर्यंत 64 किलोमीटर अंतरावरील होणार काम.  ३८९ कोटी रुपये मंजूर.  नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) आ.श्री नितेश  राणे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने देवगड निपाणी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक ११ आक्टोबर २०२४ रोजी आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते  सकाळी ठीक 10 वा. नांदगाव तिठा ब्रिज खाली आयोजित करण्यात आला आहे.   या रस्त्यासाठी शासनाकडून 389 कोटी मंजूर करण्यात आले असून देवगड  ते फोंडाघाट पर्यंत 64 किलोमीटर अंतरावरील सिमेंट काँक्रीटकरण होणार आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम चे सर्वगोड उपस्थित राहणार आहेत.तसेच या महामार्गावरील सर्व गावातील सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.       या होणाऱ्या रस्त्यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल तसेच देवगड या महामार्गावर वाढत्या अपघातांनाही आळा बसेल  सुसज्ज होणाऱ्या या रस्त्यामुळे येथील वाहन धारकांतून , जनतेतून समाधान व्यक्त होत आहे .   तरी स

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव परिसरातील शाळांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी केली पाहणी  नांदगाव प्रतिनिधी  सध्या काही ठिकाणी शाळांमधून अत्याचाराच्या घटना पाहता सतर्कता म्हणून नांदगाव परिसरातील शाळांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी आज पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आली.       नांदगाव मध्ये एकूण सहा प्राथमिक शाळांची तपासणी आज करण्यात आली यावेळी कासार्डे बिट चे हवालदार चंद्रकांत झोरे, पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी पहाणी केली आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
  अल्पवयीन युवतीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी संशयित आरोपीची सशर्थ जामिनावर मुक्तता आरोपीच्यावतीने ॲड.प्राजक्ता शिंदे यांनी मांडली बाजू कणकवली-प्रतिनिधी    फोंडाघाट - बावीचे भाटले येथील दिपक गंगाराम चौगुले याची ओरोस विशेष न्यायालयाने अल्पवयीन युवतीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केले प्रकरणी सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड.प्राजक्ता शिंदे यांनी काम पाहिले.      थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार पिडीत अल्पवयीन मुलगी ही कॉलेज मध्ये जण्याकरीता नेहमीप्रमाणे घरातून निघून गेली. त्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही नेहमीच्या वेळेत घरी परत न आल्याने तिचे नातेवाईक यांनी तिचा शोध घेतला असता ती सापडू शकली नाही. त्यामुळे तिच्या अज्ञानाचा फायदा घेवुन तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावुन पळवुन नेले.अशी  फिर्याद पोलिसांकडे देण्यात आली.त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला.       त्यानंतर गुन्हयातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी ही मिळुन आल्याने अल्पवयीन मुलगी हीला पोलीस उपनिरिक्षक आर.बी. शेळके (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग ) यांनी क

सिंधुदुर्ग today

इमेज
  मनसे पदाधिकारी  यांनी घेतले देवीचे दर्शन    कणकवली प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर आणि मनविसे जिल्हा अध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे कणकवली उपतालुका प्रमुख श्री अतुल दळवी यांनी कासार्डे येथील नवरात्र उत्सव निमित्ताने दुर्गामातेचे दर्शन घेतले आहे. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे कणकवली तालुका प्रमुख समीर तेली यांनी सर्वांचे स्वागत केले तसेच गावकऱ्यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.          गावचे सुपुत्र श्री. समीर कदम मनसे विद्यार्थी सेनेचे कणकवली तालुका प्रमुख असून पूर्ण मनसे त्यांच्या पाठीशी आहे. तुमच्या गावातील कोणत्याही मुलांचे शाळे संबंधित काही प्रश्न असतील ते समीरच्या माध्यमातून आपण पूर्ण करू अस आश्वासन जिल्हा अध्यक्ष श्री.अनिकेत तर्फे यांनी दिले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव उर्दू शाळेत शिक्षक मागणी करुनही न दिल्याने आजपासून मुलांविना शाळा  शाळेत मुलांना न पाठविण्याचा पालकांचा निर्णय  शिक्षण विस्तार अधिकारी यांची शाळेला भेट  कणकवली (ऋषिकेश मोरजकर) कणकवली तालुक्यातील नांदगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू माध्यम शाळेत मागणी करूनही शिक्षक न दिल्याने सर्व पालकांनी आजपासून शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्णय घेतलेला आहे आज पासून त्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे. जोपर्यंत आम्हाला वाढीव शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठविणार नाही अशी ठाम भूमिका आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे उपाध्यक्ष यासीन बटवाले व उपस्थित पालक यांनी मांडली आहे.      यावेळी नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर, सर्व पालक वर्ग तसेच महिला पालक वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती.       या दरम्यान कणकवली पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर यांनी या शाळेत भेट देत आपण आंदोलन स्थगित करावे अशी प्रशासनाच्या वतीने सर्व पालक वर्गाला विनंती केली आहे.यावेळी त्यांच्या समवेत केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, मुख्याध्यापक मुंगी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते

सिंधुदुर्ग today

इमेज
आरक्षण बचाव रॅली नंतर खारेपाटण विभागातील नडगिवे बौद्धवाडी येथील असंख्य ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश काँग्रेसने आरक्षण संपविण्याची भाषा केली तर मी तुमची ढाल बनून उभा राहणार असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला होता. आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत कणकवली प्रतिनिधी  कणकवली येथे झालेल्या आरक्षण बचाव रॅली मध्ये आमदार नितेश राणे यांनी "जय भीम ... चा नारा दिला होता. तसेच आरक्षण आपल्या हक्काच आहे ते कोणाला हिसकवू शकत नाही. त्यामुळे आपल्या संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता. त्यानंतर आज आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होत असंलेली विकास कामे पाहून कणकवली तालुक्यातील नडगिवे बौध्दवाडी येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. यावेळी मनोहर पगारे, गणेश जाधव, कीर्तिकांत जाधव, दीपक पगारे, यशवंत पगारे, बाबल्या जाधव, अपूर्वा पगारे, विनय पगारे , तन्मय पगारे, हरेश पगारे, रोहित पगारे, सुनील जाधव, हेमंत जाधव, दिनेश पगारे, यशवंत जाधव, अनंत पगारे, सदाशिव पगारे, यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घे

सिंधुदुर्ग today

इमेज
पहीलं लग्न होऊन ही दोन मुलांची आई दोन मुलांच्या वडीलांबरोबर पश्चिम बंगाल मधून आली पळून. हवालदार चंद्रकांत झोरे यांनी नांदगाव येथून घेतले संबंधितांना ताब्यात. कणकवली प्रतिनिधी   दोन मुलांची आई व दोन मुलांच्या वडीलांबरोबर  पश्चिम बंगाल मधून कणकवली तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी मुळ उत्तरप्रदेश चा असलेला व काही महिन्यापासून नांदगाव येथे कामानिमित्त राहत होता. याच्या सोबत पळून आली  सदर दोन मुलांची आई ही २८ सप्टेंबर पासून घरातून गेली ती न आल्याने तिच्या पतीने तेथील पोलीस ठाणे तक्रार दाखल केली होती.      दोघांचाही विवाह अगोदर झालेला असून तिला दोन मुलं तर त्याला ही दोन मुले आहेत. तो मूळचा उत्तरप्रदेश असलेला मात्र सांगली जिल्ह्यातील एका गावात १८ व्या वर्षीपासून राहत होता. यानंतर या दोघांचे इंस्टाग्राम वर सुत जुळले असल्याचे समजते आहे .त्याच अनुषंगाने सदर त्या महिलेचे मोबाईल लोकेशन  नांदगाव येथे आल्याने पश्चिम बंगाल पोलिसांनी कणकवली पोलिसांना सूचना केली होती या अनुषंगाने कणकवली पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांच्या मार्गदर्शन सुचनेनुसार पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी नांदगाव येथे राहत असले

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे  खंडित विजपुरवठा २५ तासा नंतर सुरू करताच पुन्हा खंडित. बहुतेक मोबाईल स्विच ऑफ.  कणकवली ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये काल सायंकाळी पाच वाजता विजेच्या कडकडाट व  वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली होती तर  नांदगाव परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता . याला २५ तास उलटून गेले असून विद्युत पुरवठा २५ तासाने सुरू करताच पुन्हा एकदा विज पुरवठा खंडित झाला असल्याने विज ग्राहक हैराण झाले आहेत. या मुळे नांदगाव परिसरातील बहुतेक मोबाईल स्विच ऑफ झाले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. तसेच आज सोमवार असल्याने दिवसभर काम सुरू होते.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले  विद्युत पुरवठा अद्यापही खंडित  झाडे तसेच विद्युत पोल उन्मळून पडले  कणकवली ऋषिकेश मोरजकर  कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये आज सायंकाळी पाच नंतर विजेच्या कडकडाट व  वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत तर विद्युत पुरवठा अद्यापही खंडित आहे. नांदगाव परिसरात विजेचे पोल व विद्युत लाईन वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तसेच ही जोरदार वारा प्रचंड विजेच्या कडकडाटाने 33 केवी लाईन बिघाड झाली असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे. संबंधित विभागाने कामकाज सुरू असून अजून काही तास लागेल असे सांगितले आहे.

सिंधुदुर्ग today

इमेज
नांदगाव येथे भिषण अपघातात डेकोरेट साऊंड चे व्यवसायिक रमजान साटविलकर यांचा मृत्यू  कणकवली प्रतिनिधी  कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी राज्य मार्गावर नांदगाव तिठ्या नजीक वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर दोन मोटारसायकलच्या धडकेनतंर चिरे वाहतूक करणारा ट्रक खाली सापडून मोटारसायकल स्वार श्री. रमजान साटविलकर  रा. नांदगाव खालची मुस्लिम वाडी हा रस्त्यावर पडल्याने या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल चालक अर्जुन विलास जाधव वय 24 रा.नांदगाव वाशिनवाडी याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. हा अपघात काल दुपारी 3.30 च्या सुमारास नांदगाव येथे घडला आहे.     जखमिवर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नांदगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती .      तातडीने कणकवली पोलीस निरीक्षक श्री जगताप यांच्यासह कणकवली पोलीस अपघात स्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.        रमजान साटविलकर हा नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील रहिवाशी होता. त्याचा मंडप स्पीकर डेकोरेटर्स असा व्यवसाय होता. त्याच्या प

सिंधुदुर्ग today

इमेज
  अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच' दीर्घ कवितेची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद ज्येष्ठ कवी प्रा.डॉ.दासू वैद्य यांच्या हस्ते 'युगानुयुगे तूच' च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन छ.संभाजीनगर येथील प्रकाशन सोहळ्याला अनुवादक प्रा. सुधाकर शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती कणकवली/ऋषिकेश मोरजकर        कवी अजय कांडर हे माझ्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. मराठीत दीर्घ कविता लिहिल्या गेल्या आहेत.कांडर यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितेलाही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला.आता या कवितेचा हिंदी अनुवादक प्रा.डॉ.सुधाकर शेंडगे यांनी 'युग युग से तू ही' या शीर्षका अंतर्गत केला. ही 'युगानुयुगे तूच'ची राष्ट्रीय स्तरावरील दखल कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. दासू वैद्य यांनी छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) येथे केले.       कवी अजय कांडर यांच्या लोकवाड:मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'युगानुयुगे तूच' या दीर्घ कवितेचा प्रा.डॉ. सुधाकर शेंड

सिंधुदुर्ग today

इमेज
अनिकेत तर्फे  सिंधुदुर्ग मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष तर ज्ञानेश्वर मोरे  जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून निवड  कणकवली प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी श्री .अनिकेत अनंत तर्फे यांची  निवड करण्यात आली.      मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य संघटक श्री.यश सरदेसाई, श्री.प्रशांत कनोजिया यांच्या मार्गदर्शनाने . श्री अनिकेत तर्फे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी तर श्री. ज्ञानेश्वर मोरे यांची जिल्हा संपर्क अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.      अनिकेत तर्फे हे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा मधे गेली काही वर्षे सिंधुदूर्ग उपजिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत असताना स्वतःच्या जोरावर अनेक कामे केली मुंबई गोवा मिडल कट बंद करून दाखविले, कणकवली तालुक्यातील इंग्लिश मिडीयम च्या शाळेवरील इंग्रजीत असलेलं बोर्ड मराठीत केली.  कुर्ली गावातील  नदीच्या दुरुस्तीचे काम, न

सिंधुदुर्ग today

इमेज
ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे निधन कणकवली/प्रतिनिधी      मूळ कणकवली - ओसरगाव येथील आणि मुंबई येथे पत्रकार म्हणून कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण (५३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नितीन चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.दरम्यान सिंधुदुर्गातील त्यांच्या साहित्य परिवारातील कादंबरीकार प्रवीण बांदेकर, कवी अजय कांडर, पत्रकार संजय परब, मधुकर मातोंडकर, ॲड.विलास परब,ॲड. देवदत्त परुळेकर, विलास कोळपे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.         कोकणी माणूस आणि मालवणी भाषा यावर विशेष प्रेम असणारे नितीन चव्हाण हे गेली २७ वर्षे पत्रकारितेत अतिशय तळमळीने कार्यरत होते. गरिबांच्या, वंचितांच्या वेदना, सामान्य नागरिकांच्या जगण्याचे प्रश्न ते लेखनातून मांडत असत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत पुढे आलेले नितीन चव्हाण शोध पत्रकारितेसाठी प्रसिद्ध होते. मागील वीस वर्षापासून ते मुंबई महानगरपालिकेचे वार्तांकन करत होते. गेली चौदा वर्ष महाराष्ट्र टाइम्स मध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून ते कार्यरत होते. मात्र त्यापूर्वी त्यांन