सिंधुदुर्ग today
नांदगाव उबाठा सेनेला धक्का.
सो.सा. माजी चेअरमन रवींद्र तेली व माजी उपसरपंच शशी तोरस्कर यांचा भाजपात जाहीर प्रवेश.
आमदार नितेश राणे यांच्या गाव भेट कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता या गावभेट दरम्यान नांदगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रवींद्र तेली व नांदगाव चे माजी उपसरपंच शशिकांत तोरस्कर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे यामुळे नांदगाव उबाठा सेनेला धक्का मानला जात आहे .
यावेळी विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलिप तळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई,माजी उपसभापती प्रकाश पारकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, भाजपचे सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, अनुसूचित जाती जमाती भाजपचे विधानसभा संयोजक संतोष जाधव,माजी संजय पाटील, आफ्रोजा नावलेकर, माजी उपसरपंच निरज मोरये,अल्पसंख्याक भाजपचे तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, कमलेश पाटील आदी बहुसंख्येने उपस्थित होते गाव भेट कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा