सिंधुदुर्ग today



आयनल विद्यमान सरपंच ,उपसरपंच यांचा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा जाहीर प्रवेश

कणकवली प्रतिनिधी 

आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील आयनल येथील दोन वर्षांपूर्वी गाव विकास पॅनल मार्फत विजयी झालेल्या सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या   उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आमदार नितेश राणे यांनी केले यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपचे तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,बुथ कमिटी अध्यक्ष संतोष वायंगणकर, युवा अध्यक्ष मनिष पडवळ,चंदू शिंदे, सत्यवान पेडणेकर, शक्ती केंद्र प्रमुख सुशिल इंदप, नांदगाव पंचायत समिती विभागीय अध्यक्ष रघुनाथ लोके, संतोष घाडी, प्रशांत परब आदी उपस्थित होते.

      यावेळी सरपंच सिध्दी दहिबावकर, उपसरपंच विलास हडकर व ग्रामपंचायत सदस्या योगीता फाटक यांच्या सहीत 

सचिन दहिबावकर,राजू दहिबावकर, रविंद्र दहिबावकर, प्रमोद दहिबावकर, सहदेव दहिबावकर, संजय वरक, संदेश साळसकर, रुचिता दहिबावकर, सुधीर लाड, सदानंद सावंत, प्रकाश सावंत, विलासिनी हडकर, रामचंद्र साळसकर, वैष्णवी मसुरकर, विजय दहिबावकर, आशालता करंगुटकर, अमोल फाटक , नामदेव दहिबावकर, दिलेश दहिबावकर, मनिषा मेस्त्री, आप्पा ओटवकर , रामचंद्र साळसकर आदी बहुसंख्येने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today